Dog Guinness World Record Viral Video : व्यायामशाळेत जाऊन दोरीउड्या मारून पीळदार शरीरयष्टी बनवताना अनेकांच्या नाकी नऊ येतं. अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये मोठ्या विक्रमांना गवसणी घालण्यासाठी अनेकांना कंबर कसावी लागते. पण एका पाळीव कुत्र्यानेही माणसांप्रमाणेच गिनीज वर्ल्ड रेकोर्ड करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ३० सेकंदात ३२ दोरीउड्या मारण्याचा विक्रम करून या कुत्र्याने कमालच केली आहे. २०२३ वर्षाच्या सुरुवातीलाच एका कुत्र्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा व्हिडीओ समोर आला आहे. सर्वात चांगल्या प्राण्यांच्या व्हिडीओमध्ये या कुत्र्याच्या व्हिडीओची गणना केली जात आहे. गिनीज वर्ल्ड रेकोर्डच्या इन्स्टाग्रामवर पेजवर जर्मनीतील एका कुत्र्याचा जबरदस्त व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. बालू नावाच्या कुत्र्याने दोरीउड्या मारून विक्रम केल्यानं त्याचे मालक वोल्फगॅंग यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
मालकाने कुत्र्याला प्रशिक्षण देण्यासाठी घेतली अपार मेहनत
कुत्र्याने मागच्या पायावर ३० सेकंदात ३२ दोरीउड्या मारल्या. या कुत्र्याने दोरीउड्या मारण्याची कला दाखवून गिनीज वर्ड रेकोर्ड केला. इन्स्टाग्रामवर या कत्र्याचा सुंदर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मालकाने हाता दोरी धरली असून कुत्रा दोरीउड्या मारताना या व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या पेजवर हॅशटॅगही देण्यात आले आहेत. व्हिडीओ शेअक केल्यानंतर कुत्र्याचं सोशल मीडियावर कौतुक होत असून हजारोंच्या संख्येत लाईक्सही मिळत आहेत. प्रसिद्ध गायिक अलैनी यांनीही या व्हिडीओला सुंदर प्रतिक्रिया दिली आहे. “गुड बॉय”, असं कॅप्शन देत या गायिकेनं कुत्र्याचं कौतुक केलं आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, “हे खूप सुंदर आहे.” तर तिसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, ” हे किती मोहक आहे.”
इथे पाहा व्हिडीओ
विक्रमांची नोंद ठेवणाऱ्या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी १२ जुलैला या कुत्र्याने दोरीउड्या मारण्याचा विक्रम केला. ३० सेकंदात मागच्या पायाने ३२ दोरीउड्या मारुन गिनीज वर्ल्ड रेकोर्डलाच गवसणी घालती. जर्मनीत राहणाऱ्या एका व्यक्तीने या पाळीव कुत्र्याला सक्षम बनवण्यात खूप मेहनत घेतली. पाळीव प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण नेहमीच पाहतो. पण एका कुत्र्यानं चक्क गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचं क्वचितच पाहिलं असेल. हा व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नसेल. कारण गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणं माणसांना अवघड जातं. पण या छोट्याशा प्राण्याने एव्हढा मोठा विक्रम सहज करुन दाखवला. हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.