Dog Guinness World Record Viral Video : व्यायामशाळेत जाऊन दोरीउड्या मारून पीळदार शरीरयष्टी बनवताना अनेकांच्या नाकी नऊ येतं. अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये मोठ्या विक्रमांना गवसणी घालण्यासाठी अनेकांना कंबर कसावी लागते. पण एका पाळीव कुत्र्यानेही माणसांप्रमाणेच गिनीज वर्ल्ड रेकोर्ड करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ३० सेकंदात ३२ दोरीउड्या मारण्याचा विक्रम करून या कुत्र्याने कमालच केली आहे. २०२३ वर्षाच्या सुरुवातीलाच एका कुत्र्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा व्हिडीओ समोर आला आहे. सर्वात चांगल्या प्राण्यांच्या व्हिडीओमध्ये या कुत्र्याच्या व्हिडीओची गणना केली जात आहे. गिनीज वर्ल्ड रेकोर्डच्या इन्स्टाग्रामवर पेजवर जर्मनीतील एका कुत्र्याचा जबरदस्त व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. बालू नावाच्या कुत्र्याने दोरीउड्या मारून विक्रम केल्यानं त्याचे मालक वोल्फगॅंग यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा