Pet Dog loves Bride Viral Video : लग्न सराईचा सीजन सुरु झाल्याने नवरा-नवरीचे एकाहून एक जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. एका लग्नमडंपातील सुंदर व्हिडीओने इंटरनेटवर हजारो नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. पाळीव कुत्रा किती प्रामाणिक आणि प्रेमळ असतो, याचं उत्तम उदाहरण या व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहता येईल. नवरी सासरी जायला निघाली की, वऱ्हाडी मंडळींसह कुटुंबीयांचे डोळे पाणावतात. पण घरात पाळलेला कुत्रा इतका प्रेमळ असेल, याचा कुणी विचारही केला नसले. एका लग्नमंडपात लग्नसोहळा संपन्न झाल्यानंतर नवरीला सासरी जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न एका कुत्र्याने केला. त्याचा जिव्हाळा पाहून नवरीच्या डोळ्यांतून अश्रू तरळले. हा जबरदस्त व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून अनेकांना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आश्चर्य वाटलं आहे.
भर लग्नमंडपात कुत्रा नवरीच्या जवळ गेला अन् रडू लागला, पाहा व्हिडीओ
घरातील पाळीव कुत्रा नवरीला सासरी जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करताना या व्हिडीओत दिसत आहे. प्रेमळ कुत्र्याला पाहून भर लग्नमंडपातच नवरीच्याही अश्रूंचा बांध फुटला. दोघांमध्ये असलेलं नातं पाहून लग्नसोहळ्यात उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. नवरीला पाहून कुत्रा भावूक झाला आणि थेट तिच्याजवळ जाऊन बसला. हा भावनिक क्षण पाहून अनेकांचे डोळे पाणावले. रीमिक्स व्हिडीओ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सुंदर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “प्राण्यांनाही सर्व काही माहित असतं.” तसंच नेटकऱ्यांनी या व्हिडीओला भावनिक इमोजीही पाठवले आहेत. पाळीव प्राण्यांकडे माणसांप्रती असलेलं प्रेम पाहून नेटकरीही अवाक झाले आहेत.
इथे पाहा व्हिडीओ
पाळीव प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारी माणसं आपण नेहमीच व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून पाहतो. पण एका पाळीव कुत्र्यानेही प्रामाणिक राहून लग्नात नवरीला सासरी जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. कुत्र्याचं असेलेलं खरं प्रेम पाहून नवरीलाही रडू कोसळलं. ही सर्व भावनिक दृष्य कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनं लाखो नेटकऱ्यांची मनं जिंकली असून नेटकरी व्हिडीओला छान प्रतिक्रियाही देताना दिसत आहे. काही लोकं पाळीव कुत्र्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. प्राण्यांनाही माणसांप्रमाणे भावना असतात, त्यामुळे काही माणसं अशा प्राण्यांची खूप काळजी घेतात. कुत्र्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाला आहे.