Lion attack video viral: आपल्यापैकी अनेकांना पाळीव प्राणी आवडतात. अनेकजण कुत्रा, मांजर, पोपट, असे वेगवेगळे प्राणी पाळतात. घरातील सदस्याप्रमाणेच या प्राण्यांना जीव लावला जातो आणि हे प्राणी देखील घरातील व्यक्तींना खूप जीव लावतात. पण तुम्ही कधी कोणी सिंह पाळलेला पाहिलंय का? सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका महिलेने सिंह पाळल्याचे दिसत आहे. कुत्रा किंवा मांजर या पाळीव प्राण्यांना जसे पाळले जाते, त्याप्रमाणे सिंह या रानटी प्राण्याला पाळले आहे. या गोष्टीवर सहसा कोणाचा विश्वास बसणार नाही. पण व्हायरल होणारा हा व्हिडीओ याचा पुरावा देत आहे. असं असलं तरी सिंह पाळणे महिलेच्या चांगलंच अंगलट आलंय. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
पाळीव सिंहाचा हल्ला
सिंहासारखा खतरनाक प्राणी पाळण्याचा विचार आपण स्वप्नातही कधी केला नसेल, मात्र हा व्हिडीओ पाहून कुणालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या महिलेने सिंह पाळला आहे, याचा आकारही मोठा आहे, याच्या हल्ल्यात कुणी जिवंत राहील याची जराही शक्यता त्याच्याकडे बघून वाटत नाही. दरम्यान झालं असं की महिलेचा मित्र घरी आला आणि अनोळखी व्यक्तीला पाहून सिंहाने त्याच्यावर हल्ला केला. हा हल्ला किती खतरनाक होता हे तुम्ही पाहू शकता, महिला आणि एक व्यक्ती सिंहाला मागे खेचण्याचा, अडवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्याच्यापुढे यांची ताकद कमी पडतेय. तो व्यक्तीही स्वत: सिंहाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
व्यक्तीचा पुनर्जन्म
सुदैवाने शेवटी महिला आणि तो व्यक्ती सिंहाला मागे खेचतात आणि तो व्यक्ती बचावतो. तो व्यक्ती प्रचंड घाबरलेला दिसत आहे, त्याचा पुन्रजन्मच झाला म्हणायला हरकत नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> बापरे! बिचारी कोंबडी स्वत:च गेली मृत्यूच्या दारात; कमकुवत हृदयाच्या लोकांनी पाहू नये हा Video
हा व्हिडीओ @TheBrutalNature या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जंगलात मुक्त संचार करणाऱ्या या प्राण्यांना बंदिस्त केल्यामुळे नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर टीका केली आहे. तर काहींनी अशाप्रकारे रानटी प्राण्यांना बंदिस्त करून ठेवणे गुन्हा असल्याची कमेंट केली आहे.