भारतात काही लोकं प्राण्यांच्यावरती इतकं प्रेम करतात की, त्यांना जीवापाड जपतात. घरातला सदस्य असल्यासारखे त्याची काळजी घेतात. काहीजण घरातला एक विरंगुळा म्हणून त्यांच्याकडे पाहतात. अशातच आपल्या घरातील एखादा सदस्य हरवला किंवा घर सोडून गेला तर त्यासाठी घरातील व्यक्ती कासावीस होऊन त्याचा शोध घेतात. नाही मिळाला तर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देऊन वर्तमानपत्रात जाहिरात देतात. त्यातही समाधान झाले नाही तर त्या व्यक्तीला शोधून देणाऱ्या व्यक्तीसाठी बक्षीस जाहीर करतात. ही बाब सामान्य आणि अपेक्षित अशीच आहे. मात्र हे सगळं एखादा पाळीव प्राण्यासाठी होत असेल तर? तर अशी घटना दुर्मिळच म्हणावी लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मात्र अशीच घटना चीनमध्ये घडली आहे, आणि या हरवलेल्या कुत्र्याच्या माकाने कुत्र्याला शोधून देणाऱ्याला १ नव्हे, २ नव्हे तर तब्बल १० कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे.

हे प्रकरण चीनच्या हेनान प्रांताचे आहे. यांग नावाच्या व्यक्तीचा पाळीव कुत्रा बेपत्ता झाला होता. 9 जुलै रोजी त्यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्याने सांगितले की हा एक सेवानिवृत्त कुत्रा आहे जो आदल्या रात्री झेंगझोऊच्या बेलॉन्ग लेक परिसरात बेपत्ता झाला होता. जर कोणी त्याला शोधून आणले तर भरीव बक्षीस दिले जाईल. तसेच कुत्र्याबाबतचे महत्त्वाचे संकेत जरी दिले तरी, २० लाख रुपये मिळतील. दरम्यान कुत्रा कुणाला सापडला आणि त्यांनी सुखरूप परत आणला तर त्यांना १० कोटींचं बक्षीस दिले जाईल.

त्याच दिवशी कुत्रा सापडला

कुत्र्याचा मालक यांगने सांगितले की, तियानलाँग नावाचा हा कुत्रा त्यांचा खूप खास आहे. त्यात त्याने देशासाठीही योगदान दिले आहे. कुत्र्याला कोणी दुखावले तर न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू आणि त्या व्यक्तीला धडा शिकवू, असा इशारा त्यांनी दिला. चीनच्या सोशल मीडियावर बक्षीस जाहीर होताच अनेक लोक कुत्र्याच्या शोधात बाहेर पडले. त्याच दिवशी दुपारी एका गटाला हा कुत्रा सापडला.

हेही वाचा – अतिशहाणपणा नडला! स्टंटबाजी करताना अपघात, तरुणीचा जागीच मृत्यू; VIDEO पाहून उडेल थरकाप

बक्षीस मात्र दिलं नाही

मात्र यानंतर कुत्र्याचा मालक यांगने आपला शब्द पाळला नाही, त्याने कुत्र्याला शोधून देणाऱ्या व्यक्तीला फक्त ५६००० रुपये दिले. १० कोटींचं बक्षीस सांगून मालकानं फक्त एवढेच पैसे दिल्यानं सगळेच संतापले. यावर मालक यांगने कुत्र्याला शोधण्यासाठी हा केवळ एक स्टंट होता. एवढी मोठी रक्कम बक्षीस म्हणून देणं अशक्य असल्याचंही त्यानं सांगितलं. यानंतर सोशल मीडियावर त्याच्याविरोधात सगळ्यांनीच संताप व्यक्त केला. एका युजरने म्हटले की, कोणावरही विश्वास ठेवता येत नाही. दुसरा म्हणाला, याच्यावर कारवाई करा.