Petha Making Viral Video: सोशल मीडियावर विविध खाद्यपदार्थ तयार करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओ पाहून अस्वच्छतेबाबत चिंता व्यक्त केली जाते. काही दिवसांपूर्वीच गुलाब जामुन बनवतानाचा, शेंगदाण्याची चिक्की तयार बनवतानाचा, मंच्युरिअन तयार बनवतानाचा आणि न्युडल्स तयार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता जे पाहिल्यानंतर लोकांनी खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छता राखली नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. आता आणखी एक असाच व्हिडिओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये भारतातील एका प्रसिद्ध मिठाईवर प्रकाश टाकला आहे. या स्वादिष्ट पदार्थाला पेठा म्हणतात, जो विशेषतः उत्तर भारतात प्रसिद्ध आहे. आग्राचा पेठा भारतात प्रसिद्ध आहे पण हा व्हायरल व्हिडिओ पाहून क्वचित कोणी तो खाण्याची हिंमत्त करेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओमध्ये, पेठा तयार करण्याची संपूर्ण पद्धत दाखवली आहे. सर्व प्रथम, कामगार कोहळा (पांढारा भोपळा) कापताना आणि त्याचे चार काप करून मधला भाग काढताना दिसत आहे. नंतर, त्याची साल काढून तो बाजूला ठेवतो. नंतर ते एका मशीनमध्ये टाकले जातात आणि त्याच्या संपूर्ण बिया वेगळ्या केल्या जातात. दरम्यान, नंतर हे एका मोठ्या कढईत पाण्यात टाकले जातात. त्या कढईवर मोठ्या फळ्या टाकून एक व्यक्ती त्यावर बसतो आणि या कोहळ्याचे चौकोनी काप करू त्याच कढईत टाकतो. नंतर ते दुसऱ्या चौकोनी काप भांड्यात टाकले जातात आणि त्यात पाणी सोडले जाते. काही कामगार त्याच पाण्यात तोंड धूताना दिसत आहे. नंतर पाण्यातून काढून ते काप एका मोठ्या कढई टाकले जातात. त्यात पाढंरा रंगाचा पावडरसारखा पदार्थ टाकला जातो आणि त्यात उकळवले जाते त्यानंतर त्यातून काढून त्याला साखरेच्या पाकात टाकले जाते. त्यानंतर आग्राचा पेठा तयार होतो.

हेही वाचा – कोचिंग क्लासेसला न जाता मित्रांसह मज्जा करत होता मुलगा, संतापलेल्या वडिलांनी कॅफेत घुसून दिला चोप; Video Viral

इंस्टाग्रामव @theyyummyMania पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे जो पाहिल्यानंतर लोकांना धक्का बसला आहे. दरम्यान व्हिडिओला आतापर्यंत ८.६ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. कामगारांद्वारे दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या स्वच्छतेबाबत लोकांनी टिका केली आहे.

हेही वाचा – रस्त्यावर उभा होता लोखंडी कंटनेर, क्षणार्धात तयार झाले रेस्टॉरंट, Viral Video पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही

एक जण म्हणाला, “आग्र्याचे प्रसिद्ध फेसवॉश.”
दुसरा म्हणाला, “त्यांनी त्यांचे तोंड आणि हात भांड्यात धुतले? ठीक आहे?! शेअर केल्याबद्दल धन्यवाद, आता खाणार नाही.”
तिसरा म्हणाला, “सीक्रेट घटक समडले.”
चौथा म्हणाला, “हे पाहिल्यावर पुन्हा आग्रा पेठा खाणे कठीण होईल.”
पाचवा म्हणाला, “आता आणखी एक गोष्ट मी खाऊ शकत नाही.”
तर आणखी एकजण म्हणाला, “देवाचे आभार मानतो मला प्रसिद्ध पदार्थ खाण्याची सवय नाही.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petha making viral video how to make famous agra petha snk
Show comments