टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष असणाऱ्या रतन टाटा यांना भारत रत्न देण्यात यावा अशी मागणी करणारी एक ऑनलाइन याचिका नेटकऱ्यांनी केली आहे. चेंज डॉट ओराजी या वेबसाईटच्या माध्यमातून केलेल्या या याचिकेला दोन लाख ४० हजारांहून अधिक जणांनी पाठिंबा दर्शवला असून पाठिंबा दर्शवणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या ऑनलाइन याचिकेनुसार, “रतन टाटा हे परोपकार आणि मानवतेचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांनी अनेक संशोधनांसाठी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था उभारण्यासाठी मदत केली आहे.” दीड आठवड्यापूर्वी करण्यात आलेल्या या याचिकेमध्ये टाटा ग्रुप्सच्या मदतीने उभारण्यात आलेल्या संशोधन संस्थांची यादीही देण्यात आली आहे. तसेच रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा ग्रुपच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या समाजसेवेचीही माहिती यामध्ये देण्यात आली आहे.

टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टने देशामधील करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी एक हजार ५०० कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा काही आठवड्यांपूर्वी केली होती. २८ मार्च रोजी रजन टाटांनी एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्येच त्यांनी देशामधील करोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी आणि त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी टाटा ग्रुपच्या कंपन्या शक्य ती मदत करतील असं म्हटलं होतं. “करोनाचं संकट हे मानवजातीसमोरील अत्यंत कठीण आव्हान आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहाच्या कंपन्यांनी यापूर्वी देशाला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा मदत केली आहे. सध्याचे संकटात देशाला मदतीची गरज आहे,” असं टाटा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

नक्की वाचा >> ‘टाटा ग्रुप’कडून डॉक्टरांना फाइव्ह स्टार ट्रीटमेंट! मुंबईतील पाच पंचतारांकित हॉटेलमध्ये केली राहण्याची सोय

करोना विषाणूंशी लढण्यासाठी जी यंत्रणा उभी करावी लागणार आहे, त्यासाठी हा निधी वापरण्यात येणार असल्याचे टाटांनी पोस्ट केलेल्या ट्विटमधील फोटोमध्ये नमूद करण्यात आलं होतं. करोनाशी लढणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) निर्माण करणे, करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी श्वसनप्रणाली निर्माण करणे, दरडोई चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी टेस्टींग किटची निर्मिती करणे, संक्रमित रूग्णांसाठी मॉड्यूलर उपचार सुविधा उभारणे, आरोग्य कर्मचारी आणि सामान्यांपर्यंत करोनासंदर्भातील जनजागृती करुन त्याबद्दलचे व्यवस्थापन आणि प्रशिक्षण देणे अशा कामांसाठी पैसे वापरण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं होतं.

रतन टाटांना भारतरत्न देण्याची मागणी करण्याबरोबर चेंज डॉट ओआरजीवर टाटांसंदर्भातील जवळजवळ डझनभर याचिका असल्याचे दिसून येते. अगदी रतन टाटा यांनी राष्ट्रपती करावे यासंदर्भातील याचिकाही या वेबसाईटवर आहे. “रतन टाटांना भारताचे राष्ट्रती करावे. प्रत्येक वेळेस राजकारण्यालाच का संधी द्यायची?” असा सवाल विचारणारी याचिकाही या वेबसाईटवर आहे. अर्थात तिला अगदीच कमी म्हणजेच केवळ ८३ लोकांनी समर्थन दर्शवले आहे.

टाटा ग्रुपचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जमशेदजी टाटा यांनी १९९२ साली भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petition seeking bharat ratna for ratan tata garners over 2 lakh signatures scsg
Show comments