पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेच्या नववर्षाच्या आनंदावर सरकारवरने विरझन घातले आहे. नववर्षातच महागाईमध्ये पेट्रोल प्रतिलिटर १.२९ पैसे तर डिझेलचे दर ९७ पैशांनी वाढले आहेत. पंधरा दिवसांपूर्वीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. पेट्रोल प्रतिलिटर २.२१ रुपयांनी तर डिझेल प्रतिलिटर १.७९ रुपयांनी महागले होते. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केल्यामुळे तेलाच्या किंमती वाढताना दिसत आहेत. यापार्श्वभूमीवर सध्या पेट्रोल हॅशटॅग ट्रेंण्ड करताना दिसत आहे. दरवाढीमुळे ट्विटरकर सरकारच्या निर्णयावर भडकल्याचे दिसत आहे.
Jis hisab se #Petrol Diesel ke price bar rahe hai … I think it's time for all to go Carless
— Fidus Achates (@Sohni_Bose) January 1, 2017
[jwplayer itkTOSml]
ज्या पद्धतीने सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ होत आहे. त्यानुसार सरकार जनतेला कॅशलेसकडून कारलेसकडे घेऊन जाणार असे मत एका नेटीझन्सने व्यक्त केले. तर काही नेटीझन्सनू मोदींचे नेतृत्व देशासाठी हानीकारक असल्याचे म्हटले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढणे हे म्हणजे देशभक्तीच्या योजनेसाठीची आहुती असल्यासारखे आहे, असे सांगत एका ट्विटरकराने सरकारची खिल्ली उडवली आहे. वर्षाअखेर पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून ‘मित्रों’ हा शब्द वगळून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांच्या या भाषणाचा उल्लेख करत एका नेटीझन्सने मोदींवर निशाणा साधला. आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून ‘मित्रो’ हा शब्द हद्दपार करुन नववर्षाच्या पूर्वसंध्येला तात्काळ वाईट बातमी दिली होती. आता दोस्तानों असे संबोधित करत दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी आणखी एक वाईट बातमी दिली, असे त्याने म्हटले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर भडकल्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून लोक व्यक्त होत आहेत. नोटाबंदीने त्रस्त असणाऱ्या जनतेला सरकारने पेट्रोल दरवाढीचे भेट दिल्याचे देखील ट्विट एका नेटीझन्सने केले आहे.
[jwplayer 2LHpW07p]
https://twitter.com/iamhussain_shah/status/815584420778442752
https://twitter.com/lamboomishra/status/815577068167569408
Mistry solved:
Mitron : Immediate bad news.
Doston: Bad news the next day.#Diesel #Petrol— IMRAN KHAN (@imranmkkhan) January 1, 2017
mitron, yeh Rs 0.97 hike in #petrol & diesel price hike sirf price rise nehin hai…this is your aahuti in the Yagna of desh bhakti…enjoy
— Lambodar Mishra (@lamboomishra) January 1, 2017