गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडत चालले आहेत. तर अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलमध्ये भेसळ होत असल्याचं समोर आलं आहे. नुकताच पुण्यात एक भयंकर प्रकार उघड झाला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. आतापर्यंत आपण दुधात पाण्याची भेसळ केल्याचे पाहिले आहे.
आता मात्र दुधाप्रमाणेच पेट्रोलमध्ये देखील पाण्याची भेसळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनांमध्ये पेट्रोल ऐवजी ८०% पाणी भरण्यात येत असल्याचा दावा चालक करत आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की,पुण्याच्या एका पेट्रोल पंपावर भेसळयुक्त पेट्रोल दिलं जात आहे. पेट्रोल पंपावर एक माणूस पेट्रोल भरायला जातो. पेट्रोल भरून झाल्यावर त्यात पाणी असल्याची शंका येताच तो त्याची स्कूटर जमिनीवर पाडतो आणि त्यामुळे पेट्रोल खाली वाहू लागतं. असं पेट्रोल पाहून तिथे जमलेल्या सगळ्यांचीच खात्री पटते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @punepulse या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘पुण्यातील पेट्रोल पंपावर पेट्रोलऐवजी त्यात ८०% पाणी मिसळत असल्याने वाहने बिघडली.’,अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच या व्हिडीओला २ लाखाच्या वर व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “भरपाई द्यायला हवी प्रत्येक गाडीवाल्यांना” दुसऱ्याने कमेंट करत लिहिले, “मग आपल्याला मिळत असलेले इंधन खरोखर योग्य दर्जाचे आहे याची पुष्टी कशी करायची.” एकाने, “मग काय कारवाई झाली? त्याचा परवाना रद्द झाला का?” अशी कमेंट केली.