फिलीपाईन्स एअरलाईन्समध्ये काम करणाऱ्या एका हवाई सुंदरीने सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. एका महिलेने आणलेले बाटलीबंद दूध संपल्याने बाळ भुकेने व्याकूळ होऊन रडत होते. त्यावेळी २४ वर्षीय हवाई सुंदरीने स्वत: बाळाला स्तनपान केले. त्यानंतर बाळाच्या रडण्याचा आवाज बंद झाला. २४ वर्षीय हवाई सुंदरीचे नाव पत्रिशा आहे.
पत्रिशाला उड्डाणावेळी विमानात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. पत्रिशा ज्यावेळी बाळाजवळ पोहोचली तेव्हा आईने आणलेले बाटलीबंद दूध संपल्याने बाळ भुकेने व्याकूळ असल्याचे समजले. त्यानंतर पात्रिशाने कशाचीही परवा न करता स्वत: बाळाला स्तनपान केले. पात्रिशाने आपल्या फेसबुकवरून ही माहिती दिली आहे. विमानात घडलेला सर्व प्रसंग तिने सांगितला आहे. त्यानंतर नेटिझन्सनी पत्रिशावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.
काय झाले होते नेमके –
सहा नोव्हेंबर रोजी विमान उड्डाण करण्यास सज्ज होते त्यावेळी पत्रिशाला विमानातून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. बराच वेळ मुलाचे रडणे थांबत नसल्याचे पाहून तिने विचारपूस केली. त्यावेळी तिला समजले मुलासाठी आणलेले दूध संपले आहे. आणि विमानात दूध उपलब्ध नाही. मुलाची आई रात्रीपासून विमानतळावर अडकली होती. त्यामुळे तिच्याजवळील असलेल्या बाटलीतील दूध संपले होते. त्यावेळी पत्रिशाने स्तनपानाचा पर्याय आईसमोर सुचविला. स्तनपानानंतर मुलाच्या रडण्याचा आवाज शांत झाला आणि विमानातील अन्य प्रवाशीही सुखावले.