सोशल मीडियावर सध्या बांगलादेशमधील कामगाराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अत्यंत साध्या कपड्यांमध्ये असणारा हा कामगार आपल्या डोळ्यांमुळे चर्चेत असून अनेकजण त्याला पाहून फोटोमुळे प्रसिद्ध झालेल्या अफगाणिस्तानमधील मुलीची आठवण येत असल्याचं सांगत आहेत. हा कामगार मलेशियात बांधकामाच्या ठिकाणी काम करतो. व्हायरल झालेल्या फोटोत तो कॅमेऱ्याकडे पाहत असल्याचं दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल झालेल्या या फोटोला 24 हजार 500 जणांनी रिट्विट केलं असून 68 हजार 700 जणांनी लाइक केलं आहे. 21 मार्चला फोटो हा ट्विट करण्यात आला आहे. क्वाला लंपूर येथील फोटोग्राफरने हा फोटो काढला असून आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट केला आहे. मलेशियात एका बांधकामाच्या ठिकाणी काढला असल्याचं त्यांनी ट्विटरवर सांगितलं आहे.

‘तो खूप लाजत होता. फोटो काढताना कुठे पहायचं हे त्याला कळत नव्हतं…मी त्याला अनेकदा कॅमेराकडे बोट करुन दाखवत होतो. खूप फोटो काढले पण ते काही चांगले येत नव्हते. पण शेवटी त्याने कॅमेऱ्यात पाहिलं आणि मला हवा तो फोटो मिळाला. सुंदर आहे ना फोटो ?’, असं त्याने ट्विटमध्ये लिहिलं आहे.

काहीजणांनी हा फोटो पाहिल्यानंतर 1984 रोजी नॅशनल जिओग्राफिकच्या कव्हर पेजवर आलेल्या ‘अफगाण गर्ल’ शरबत गुला यांच्या फोटोची आठवण आल्याचं म्हटलं आहे.