बिहार शालेय परीक्षा समिती आणि वाद यांच्यातील संबंध प्रदीर्घ काळापासून सुरू आहेत. बिहार बोर्ड अनेकदा या ना त्या कारणाने चर्चेत असते. इंटरनल आणि मॅट्रिकच्या निकालामुळे बिहार बोर्ड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, मात्र यावेळी ही चर्चा बोर्डाच्या कर्मचाऱ्यांमुळे नाही तर परीक्षार्थींच्या कृतीमुळे होत आहे.
वास्तविक, बिहारमधील छपरा जिल्ह्यात मॅट्रिक परीक्षेच्या उत्तरपत्रिका चेकिंग सुरू आहे. परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रकार घडत असताना अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे लिहिण्याऐवजी कथा लिहिल्या गेल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्नाच्या उत्तरात भोजपुरी गाणी लिहिली, काही मुलींनी गुरुजींना उत्तीर्ण करण्याचे विनंती केली आहे. तर काहींनी १००, २०० आणि ५०० रुपये त्यांच्या उत्तरपत्रिकेतमध्ये ठेवले.
(हे ही वाचा: शिकार करण्यासाठी चित्त्याने घेतली हरणावर झेप पण…; बघा Viral Video)
उत्तरपत्रिकेचे फोटो व्हायरल
दुसरीकडे मॅट्रिकच्या कॉपीमध्ये मुलींनी लिहिलं की, ‘सर कृपया मला परीक्षेत पास करा. नाहीतर चांगल्या मुलाशी लग्न करू शकणार नाही. पप्पा घरातून हाकलून देतील.” असे लिहिले. काही मुलांनी फिल्मी गाणी लिहिली आहेत. अशाच उत्तरपत्रिकेचे फोटो व्हायरल होत आहेत. अनेक उमेदवारांनी उत्तरपत्रिकेवर आपला मोबाईल क्रमांकही लिहिला आहे. यावर फोन केल्याची चर्चा आहे. उत्तरपुस्तिका तपासणारे अनेक गुरुजीही मोबाईल नंबरवर बोलत असल्याचे सांगितले जाते. त्यांच्याकडून गुण वाढवण्यासाठी परीक्षार्थी आणि त्याचे कुटुंबीयही डील करत आहेत अशीही चर्चा आहे.
(हे ही वाचा: Viral: …आणि सिंहीणीने हवेतच पकडली शिकार, अंगावर शहारा आणणारा Video)
मॅट्रिकच्या परीक्षेत एका विद्यार्थ्याने भोजपुरी गाणे लिहिले. त्या विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिका व्हायरल होत आहे. विद्यार्थ्याने २१ क्रमांकाच्या प्रश्नाच्या उत्तरात ‘तोहरा आंखिया के कजरा ही जान झगडा करे देल बा’ असे लिहिले आहे तर २२ क्रमांकाच्या प्रश्नाच्या उत्तरात ‘तोरा बिना हुलिया बिरन लागे गोरी रे’ असे लिहिले आहे. उत्तरपत्रिकेत लिहिलेल्या भोजपुरी गाण्याचा स्क्रीन शॉट व्हायरल झाल्यानंतर सर्व प्रकारच्या चर्चा रंगत आहेत. प्रत तपासणाऱ्यांना उत्तरपत्रिकेत विविध प्रकारची उत्तरे लिहिण्यात येत आहेत.