सण, उत्सव अगदी कुटुंबसुद्धा पोलिसांसाठी आपल्या कर्तव्यानंतर येते. काही होऊ दे आपल्या कर्तव्यात कधी अडसर येता कामा नये म्हणून ते प्रयत्न करत असतात. पाऊस, वारा, थंडी, ऊन काही असो आपल्या वर्दीशी इमान राखत पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात, आणि हेच दाखवणारे एक छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
हे छायाचित्र आहे हरियाणामधल्या एका पोलिसाचे. मुसळधार पाऊस पडतो आहे तरीही रेनकोट, छत्री न घेता ते ही अनवाणी हा पोलीस आपले कर्तव्य बजावत आहे. राकेश कुमार असे या पोलिसाचे नाव आहे. त्यांच्या या अनवणी भररस्त्यात उभे राहुन काम करण्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. त्यातल्याच एकाने त्याचा फोटो काढून फेसबुकवर शेअर केला. त्याला याबाबत विचारले असता त्याने दिलेले उत्तर हे कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल असेच होते. आपल्याकडे चपलेची एकच जोड आहे. जर पावसात घालून आलो असतो तर ती भिजली असती मग उद्या कामावर भिजलेले बुट घालून काम करण कठीण होते, म्हणून मी अनवाणी पावसात उभा आहे असेही त्याने सांगितले.
राहुल शर्मा याने  त्याचे छायाचित्र टीपले असून या पोलिसाची कथा इतर लोकांपर्यंत पोहचावी यासाठी त्याने विनंती केली आहे.

Story img Loader