जी-२० परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीनमध्ये गेले आहेत. या परिषदेसाठी अनेक देशांचे नेते उपस्थित आहेत. वाढता दहशतवाद, व्यापार यासारखे अनेक विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. पण भारतीय नेटीझन्स मात्र एका वेगळ्याच विषयावर चर्चा करत आहेत. नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आणि हाच फोटो चर्चेचा विषय बनला आहे.
हा फोटो नेमका कोणत्या प्रसंगाचा आहे हे मात्र समजत नाही. या फोटोत बराक ओबामा हे पुढे आणि मोदी त्यांच्या मागे आहेत. मोदी रागात हातवारे करत आहेत. त्याच वेळी छायाचित्रकाराने अगदी अचूक हे छायाचित्र टिपले आहे. या फोटोवरून नेटीझन्सची विनोदबुद्धी जागी झाली नाही तर नवलच म्हणावे लागेल. त्यामुळे ट्विटर, फेसबुक यासारख्या सोशल मीडिया साईट्वर नेटीझन्स या फोटोवरून खिल्ली उडवत आहेत. आपली विनोदबुद्धी वापरून या फोटोवर अनेक विनोद केले जात आहेत. पुढे चालत जाणा-या ओबामांना मोदी कोणता इशारा देत आहे असा सवाल नेटीझन्सच्या डोक्यात आला आणि त्यांनी त्याची भन्नाट उत्तरे ट्विटरवर दिली आहेत. पण सगळ्यात जास्त नेटीझन्सने रिलायन्स जीओ वरून मोदी ओबांमाना सूचना देत असतील असा तर्क लावला आहे. ‘जर तुम्ही माझे ऐकले नाही तर रिलायन्स जीओचे सिम मिळणार नाही’ अशी ओळ लिहून खिल्ली उडवली जात आहे. तर काही जण मोदी ओबामांच्या जून्या गळाभेटींचे दाखले देऊन टेर खेचत आहे. अमेरिका भेटीत मोदी यांनी ओबामांना आलिंगन दिले होते. त्या गळाभेटीचे फोटो देखील असेच व्हायरल झाले होते त्यावरूनही ट्विटरवर खूपच खिल्ली उडवली गेली होती.

Story img Loader