संघर्ष कोणाला चुकला आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संघर्ष असतो. अशातच सोशल मीडियावर रोज अनेक नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात, काही व्हिडीओ आपल्याला हसवतात, तर काही व्हिडीओ खूप काही मोलाचा संदेश देऊन जातात. यात काही व्हिडीओ असे असतात जे पाहिल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की, या जगात खरंच माणुसकी शिल्लक आहे का? पण, काही व्हिडीओतून खऱ्या माणुसकीचे दर्शन आपल्याला घडते. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होतोय. यामध्ये तरुणाने जे केलंय ते क्वचितच कोणी करेल.

असं म्हणतात, माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे. सर्वांना मदत करावी आणि सर्वांबरोबर माणुसकीने वागावे. सध्या अशीच एक घटना व्हायरल होत आहे. या फोटोमधून तुम्हाला माणुसकीचे दर्शन घडून येईल.माणुसकी म्हणजे “निस्वार्थपणे केलेली मदत” माणसाने माणसाला माणसा सारखं वागवणं म्हणजे माणुसकी. यात पोटजात,जात, पंथ,धर्म,भाषा,देश इत्यादी सर्व भेदाभेदां पलिकडे जाऊन फक्त माणूस म्हणून दुसर्‍याचा विचार करुन त्याला/तिला सहानुभूतीपूर्वक जमेल ती आणि जमेल तेवढी मदत करणे म्हणजे माणुसकी. त्यांच्या सुखदुःख्खात सहभागी होणे म्हणजे माणुसकी. तर याची दुसरी बाजू म्हणजे, आपल्याकडून कधीही कुणाचे नुकसान होऊ नये ही भावना असणे. या तरुणानंही असंच केलं, त्याच्याकडून चुकून झालेल्या नुकसानाची परतफेड करण्यासाठी त्यानं जी इमानदारी दाखवेलीय ती पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

नेमकं काय घडलं?

तर त्याचं झालं असं की, पार्क केलेल्या एका बाईकची काच तरुणाकडून चुकून तुटते. मात्र यावेळी त्या बाईकचा मालक त्याठिकाणी नसतो, मग नुकसान भरपाई द्यायची कशी असा विचार करतो आणि गाडीवर एक चिठ्ठी लिहून चिटकवतो. या चिठ्ठीवर तो, “तुमच्या गाडीची काच माझ्याकडून तुटली पण मी भरुन देतो…” आणि पुढे त्यानं त्याचा नंबरही लिहला आहे. यापुढे काय झालं हे एकून तुम्हीही अवाक् व्हाल. कारण या तरुणाकडून ज्या गाडीची काच तुटली होती, ती गाडी त्याच्याच एका मित्राची होती, मात्र या तरुणाला त्याची कल्पना नव्हती. पुढे त्याचा मित्र त्याला कॉल करतो आणि सगळा प्रकार लक्षात आणून देतो. तसेच आपला मित्र एवढा इमानदार आहे हे पाहून खूशही होतो.

पाहा फोटो

हेही वाचा >> “भावकी…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही की लोक म्हणाले, ‘बरोबर बोललास भाऊ…’ PHOTO पाहून तुम्हीही हसाल

हा फोटो सोशल मीडियावर ek_marathi1 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.