Wedding Viral video: लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. नव्या नवरीचे अनेक व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच एका लग्नातला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये फोटोशूट करताना फोटोग्राफर वारंवार एका नवरीला स्पर्श करत आहे. यावर नाराज झाल्याने नवरदेवानं काय केलं ते तुम्हीच पाहा. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोझ सांगण्याच्या बहाण्याने फोटोग्राफर करत होता स्पर्श

सोशल मिडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लग्न झाल्यानंतर वराला बाजूला सारत नवरीचा क्लोजअप फोटो काढण्याच्या नादात फोटोग्राफरला चांगलाच दणका बसल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये फोटोशूट करताना फोटोग्राफर वारंवार एका नवरीला स्पर्श करत आहे. हे सगळं नवरदेव बघून बघून घेतो आणि त्या फोटोग्राफरला मारायला सुरुवात करतो आणि रागात म्हणतो, दुरून फोटो घेता येत नव्हता का? फोटोग्राफरला पडल्यानंतर नवरी स्टेजवरच जोर जोरात हसायला लागते.

नवरीच्या खळखळून हसण्याचे नेटीझन्स दिवाणे

बरं फोटोग्राफरने नवरदेवाचा मार खाल्ल्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल होत नाहीये. तर फोटोग्राफरने मार खाल्ल्यानंतर नवरीच्या खळखळून हसण्याचे सगळे नेटीझन्स दिवाणे झाले आहेत. नवरीच्या हसण्यामुळे हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आपल्या नवऱ्याने फोटोग्राफरला मारल्याचे कळताच तिने मंचावरच पोट खळखळून हसायला सुरुवात केली. तिचे हे हसणे बाजूच्या एकाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजू शकले नसले तरी नवरीच्या दिलखुलास हसण्यामुळे हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ punjabi_industry__ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही प्रतिक्रिया देत आहेत. एकानं प्रतिक्रिया दिलीय की, “एकदम बरोबर केलं अजून चोपलं पाहिजे” तर आणखी एकानं, “नवरी का अशी हसतेय” असा सवाल केलाय. हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला होता. यानंतर तो लाखो लोकांनी पाहिला.