बकरी ईदनिमित्त बांगलादेशाची राजधानी ढाक्यात वाहिलेले रक्ताचे पाट पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या आठवड्यात बकरी ईदनिमित्त ढाक्यातही मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात बक-यांची कुर्बानी दिली होती. पण याच दिवशी ढाक्यात जोरदार पाऊस पडल्याने पाण्याचा निचरा झाला नव्हता त्यामुळे गल्लोगल्ली गुडघाभर पाणी साचले होते आणि याच पाण्यात कुर्बानी दिलेल्या बक-यांचे रक्त मिसळल्याने गल्लोगल्ली रक्ताचे पाणी वाहत होते. हे फोटो सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाल्यावर याची चांगलीच चर्चा रंगली होती.
पण कित्येकांनी हे फोटो समोर आल्यानंतर ते फोटोशॉपमध्ये मॉर्फ केले गेले असल्याचा आरोप केला होता. हे फोटो खरे नसून केवळ बदनामी करण्यासाठी फोटोशॉप करण्यात आले असल्याचे सांगत अनेकांनी या फोटोंवर आक्षेप घेतला होता. पण आता एक खरा आणि एक खोटा असे दोन्ही फोटो पुन्हा एकदा समोर आले आहे. यातला खरा फोटो कोणता आणि खोटा कोणता हे कसे ओळखावे हे देखील सांगितले आहे. पाण्याचा निचरा न झाल्याने ढाक्यातील गल्लोगल्ली पाणी साचले होते हे खरे आहे पण नेटीझन्सने बदनामी करण्यासाठी पाण्याचा फॉटोशॉपवर रंग बदलून तो लाल केला असल्याचा आरोप केला गेला होता. त्यामुळे काहींनी रक्त न मिसळलेला गढूळ पाण्याचा फोटो सोशल मीडियावर टाकला आणि हे खरा फोटो असल्याचा कांगावा केला. पण बारकाईने बघीतल्यावर त्यातील माणसे हि हिरव्या रंगाची दिसत असल्याचे स्पष्ट आहे त्यामुळे ते फोटो खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे.
बकरी ईदच्या दिवशी जोरदार पाऊस पडत असल्याने अनेकांनी कुर्बानी देण्याच्या जागी बक-या न कापता त्या आपल्या बिल्डिंगच्या खाली किंवा घराशेजारी कापल्या होत्या त्यामुळे रक्त पाण्यात मिसळून रक्ताची नदी गल्लीबोळ्यातून वाहत होती.

Story img Loader