मागील काही दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत खूप वाढ झाली आहे. पावसाच्या पाण्यामुळे दिल्लीतील अनेक भाग पाण्याखाली गेला आहे. मात्र, आता दिल्लीतील पुराचे पाणी ओसरू लागले आहे. मात्र, दुपारपर्यंत यमुनेचे पाणी सुप्रीम कोर्टाच्या परिसरात पोहोचले होते, ज्याचे, फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
यमुनेचे पाणी सर्वोच्च न्यायालयाच्या दारात –
यमुना नदीला आलेल्या पुरामुळे दिल्लीतील अनेक भाग पाण्याखाली गेला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री, एलजी आणि दिल्ली सरकारचे मंत्री सतत परिस्थितीचा आढावा घेत आहेत. शिवाय १३ जुलैच्या रात्री अचानक पाणी वाढल्याने ते थेट सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीपर्यंत पोहोचेल, असा अंदाज लावला जात होता. तर हे पाणी अडविण्यासाठी धरण बांधण्याचं काम सुरू करण्यात आले होते, मात्र ते पुर्ण न झाल्याने शेवटी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पाणी पोहोचलं.
नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया –
सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात पाणी पोहोचल्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी वेगवेळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी लिहिलं आहे, “दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात पोहोचली यमुना जी, सर्वोच्च न्यायालयाने तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे, म्हणाले, “आधी हायकोर्टात जा.” नवलकांत सिन्हा यांनी लिहिलं, “अमा दहशतवादी आणि देशद्रोही यांच्या याचिकेसारखं दिल्लीच्या पुराचे पाणी झालं आहे. कनिष्ठ न्यायालया आणि उच्च न्यायालयाऐवजी थेट सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.”
तर एका यूजरने लिहिले की, “दिल्ली सरकारचे लोक रात्रीपासून प्रयत्न करत होते की धरण बांधून सुप्रीम कोर्टापर्यंत पाणी पोहोचू नये, पण तसे होऊ शकले नाही आणि पाणी कोर्टापर्यंत पोहोचले.” दुसर्याने लिहिले, ‘दिल्लीच्या व्यस्त रस्त्यांवर पूर आला आहे, राज घाट पाण्याखाली गेला आहे. सर्वोच्च न्यायालय पाण्यात आहे पण मोदी पॅरिसमध्ये आहेत. शुक्रवारी सकाळी यमुना नदीची पाणी पातळी २०८.४० मीटरवर पोहोचली आहे. ते धोक्याची चिन्ह २०५ मीटरपासून ३.४ मीटरने जास्त आहे. पुराचे पाणी यमुना बाजार, लाल किल्ला, राजघाट आणि ISBT-काश्मीरी गेटपर्यंत पोहोचले. मात्र, ताज्या माहितीनुसार आता पाणी ओसरू लागले आहे.