‘व्हॅनिटी फेअर’ मासिकाचा एक अंक नुकताच प्रसिद्ध झाला. हा अंक सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल झाला. पण, ट्रोलिंगचं कारण मात्र यातल्या चटपटीत गॉसिप्स किंवा लेख, मुलाखती नसून पहिल्या पानांवर झळकलेला मान्यवरांचा फोटो होता. एवढ्या मोठ्या मासिकाच्या कव्हर पेजवर एक नाही तर दोन दोन फोटो एडिटिंगच्या मोठ्या चुका होत्या. त्यामुळे ही बाब हॉलिवूडमधल्या सगळ्यांनी ट्विट करत ‘व्हॅनिटी फेअर’च्या निदर्शनास आणून दिली.
या मासिकाच्या पहिल्या पानावर ओप्रा विंफ्रे, रिस विदरस्पून यांचा फोटो छापण्यात आला. यात ओप्रा यांना एक सोडून तीन तीन हात दाखवण्यात आले होते. तर रिस विदरस्पून हिला तर तीन पाय दाखवले होते. त्यामुळे अर्थात व्हॅनिटी फेअरचा हा अंक एका फोटो एडिटींमुळे कमालीचा चर्चेतही आला आणि ट्रोलही झाला. विशेष म्हणजे ही चूक त्यावेळी कोणाच्याही लक्षात आली नाही. रिसनं तर ‘मला तीन पाय आहेत, तेव्हा मला मी जशी आहे तशी हा समाज स्विकारेल का?’ अशी मजेशीर टिका केली आहे. तर ओप्रानंही मजेशीर ट्विट केलंय.
‘व्हॅनिटी फेअर’च्या मोठ्या फोटो एडिटींग घोळामुळे या मासिकाचं हसं झालं पण त्यांनीही आपली चूक मोठ्या मनानं मान्य देखील केली. ‘एवढा सगळा भार ओप्रा दोन हातांनी कसं सांभाळतील तेव्हा आम्ही तिला तीन हात दिले’ असं ट्विट करत ‘व्हॅनिटी फेअर’नं आपला फोटो एडिटिंगचा घोळ निस्तरला पण याची चर्चा मात्र दिवसभर सोशल मीडियावर पाहायला मिळाली.
I accept your 3d leg. As I know you accept my 3d hand
— Oprah Winfrey (@Oprah) January 25, 2018
As for @Oprah, how can we expect her to juggle it all with just two hands? (We are correcting this error online.) https://t.co/QNd74YtSTz
— VANITY FAIR (@VanityFair) January 25, 2018
oprah has three hands & reese has three legs, and we are here for accepting them for who they are!! 2018 is all about LOVING OUR BODIES!! pic.twitter.com/TX7L2JIDno
— tyler oakley (@tyleroakley) January 25, 2018
While we would have loved the exclusive on @RWitherspoon's three legs, unfortunately it's just the lining of her dress. https://t.co/HJjvbc037S
— VANITY FAIR (@VanityFair) January 25, 2018
Now that Oprah has been exposed as an alien with three hands, her prospective presidential candidacy takes on more sinister overtones: pic.twitter.com/ZzP3GDza7x
— (((Yair Rosenberg))) (@Yair_Rosenberg) January 25, 2018