Physics Wala Teacher Beaten By Chappal In Class Video: फिजिक्स वाला अॅपवर लाईव्ह क्लासदरम्यान एका विद्यार्थ्याने शिक्षकाला चप्पलेने मारल्याची विचित्र घटना सध्या चर्चेत आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांना नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक शिक्षक लाईव्ह क्लास घेत असतो. तेव्हा अचानकच एक विद्यार्थी हातात चप्पल घेऊन शिक्षकांच्या मागे येतो आणि अचानक शिक्षकाला मारहाण करू लागतो हे सगळं इतक्या वेगाने घडतं की शिक्षक सुद्धा काही क्षण गांगरून जातो.

या हाणामारीत विद्यार्थी इतका जास्त रागावलेला दिसतोय की शिक्षकाला त्याचा हल्ला उलटवून लावायला तर सोडा पण थांबवायला सुद्धा जमत नाही. या हल्ल्यामागील हेतू अद्याप अस्पष्ट असून, घटना घडल्यापासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अवघ्या नऊ सेकंदाच्या या व्हिडीओची मूळ बाजू जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत पण अद्याप संबंधित विद्यार्थी किंवा फिजिक्स वाला अॅपच्या वतीने कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Video: भरवर्गात शिक्षकाला चपलेने मारहाण

फिजिक्स वालाची स्थापना २०१६ मध्ये उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील शिक्षणतज्ज्ञ अलख पांडे यांनी केली होती. सह-संस्थापक प्रतीक महेश्वरी यांच्यासह, पांडे यांनी फिजिक्स वाला अॅप बनवले होते. या अॅपवर विशेषत: NEET आणि JEE सारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी वर्ग घेतले जातात.

Story img Loader