PIB Fact Check : सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. सोशल मीडियावर या योजनांसंदर्भात अनेकदा त्यांची माहितीही शेअर केली जाते. सध्या असाच एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये तरुणांना फ्री लॅपटॉप मिळणार असल्याचे म्हटले आहे. पण, अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले किंवा असे मोठे दावे करणारे मेसेज खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे. या फ्री लॅपटॉपसंदर्भात पीआयबीने फॅक्ट चेक केले आहेत.
या व्हायरल मेसेजमध्ये काय आहे?
या व्हायरल मेसेजमध्ये तरुणांना फ्री लॅपटॉप मिळणार असल्याचे आमिष दाखवण्यात आले आहे आणि मेसेजमध्ये एक लिंक दिली आहे. या लिंकवर क्लिक करून वैयक्तिक माहिती शेअर करण्यास सांगितले आहे.
पीआयबीने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये काय आले समोर?
पीआयबीने या संदर्भात फॅक्ट चेक केले आणि सत्य समोर आणले. पीआयबीने सांगितले की, हा मेसेज व त्यात दिलेली लिंक फसवी आहे आणि अशा फेक मेसेजपासून दूर राहा, असे आवाहनही त्यांनी ट्विटद्वारे केले आहे.
@PIBFactCheck या अधिकृत अकाउंटवरून पीआयबीने या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.