Pickle Viral Video : तुमच्यापैकी अनेकांना जेवणाबरोबर लोणचं खायला आवडत असेल. चांगली किंवा आवडीची कोणती भाजी नसेल, तर अशा वेळी लोणचं-चपातीवरदेखील भागते. काहींचे जेवण तर लोणच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. इतकंच काय बरेच जण हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतरही तिथे मिळणारं लोणचं अगदी ताव मारून खातात. ते टेबलापर्यंत लोणचं आणून दिलं नाही, तर मागून घेतील; पण लोणच्याशिवाय जेवणार नाहीत. पण, तुम्हीपण अशा प्रकारे हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये लोणचं ताव मारून घेत असाल, तर एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच; जो पाहून तुम्हालाही किळस वाटेल.

‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्ही लोणचं खाणं बंद कराल

कोणताही खाद्यपदार्थ बनविताना स्वच्छता फार महत्त्वाची असते; अन्यथा आजारपणाचा धोका वाढतो. अन्नातून विषबाधा किंवा इतर काही आजार होण्याचीही शक्यता वाढते. पण, सोशल मीडियावर एक लोणचं बनवितानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. कदाचित हा व्हिडीओ पाहून तुम्ही लोणचं खाणं बंद कराल. कारण- लोणचं बनविण्याची पद्धत पाहून तुम्हालाही किळस वाटेल.

“मराठीनंतर उर्दूला अभिजात भाषेचा दर्जा द्या” उद्धव ठाकरेंची मागणी? पोस्ट व्हायरल; कॉल करताच समजलं सत्य…

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका मोठ्या प्लास्टिकच्या बॅनरवर कैरीचे बारीक तुकडे पसरवले आहेत. यावेळी तिथले कर्मचारी त्यावर मीठ पसरवतात. नंतर मसाला व आणखी काही मसाले, लसूण टाकतात आणि हे मिश्रण मिसळतात. नंतर हे सर्व मिश्रण मोठमोठ्या ड्रममध्ये भरून ठेवतात. पण, तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हातात ना सुरक्षिततेसाठी हातमोजे (सेफ्टी ग्लोव्हज) घातलेत ना स्वच्छतेची कसली काळजी घेतली नाही. पण, अनेकांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना लोणचं बनविण्याची पद्धत फार आवडली आहे; तर काहींनी बाहेरच्या पदार्थांपेक्षा हे तरी ठीक आहे, असं म्हटलं आहे.

हा व्हिडीओ nitinlone358 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; ज्यावर लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. एकानं लिहिलं की, एवढं बारीक बघायचं म्हटल्यावर सगळ्याच गोष्टी खायच्या सोडाव्या लागतील. उपाशी मरावं लागेल. दुसऱ्या युजरनं लिहिलं की, ब्रॅण्डेड खा, तिथे ऑटोमॅटिक प्रोसेस असते बऱ्यापैकी.तिसऱ्या युजरनं लिहिलंय की, माझ्या जन्मापासून तर आठवत नाही मला की, आमच्या घरात विकतच लोणचं आणलं आहे. आमची आई घरीच खूप मस्त लोणचं बनवते. चौथ्या युजरनं लिहिलं की, हो, पैसेवाल्यांना कष्ट नको वाटतात. मग छान डबा पॅकमध्ये असंच असतं. शेवटी एका युजरनं लिहिलं की, मग बनवा स्वत: घरी आणि खा. असं बारकाईनं बघितलं, तरं सगळीकडे खराब दिसेल.