सोशल मीडियावर दारुड्यांचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. एकदा दारु पोटात गेली की बाहेरच्या जगाशी या लोकांचा काही संबंध नसतो. मद्यपान आपल्या आरोग्यासाठी किती हाणीकारक आहे याची आपल्या प्रत्येकाला कल्पना आहे. याच दारूमुळे आपली जवळची नातीही दुरावतात. काही टेंशनमध्ये आहे असं म्हणत दारु पितात तर काही हप्ताभर कामाचा ताण घालवण्यासाठी पित असल्याचं म्हणतात. हल्ली भारतात वर्क हार्ड पार्टी हार्डर कल्चरचं नवं फॅड आलं आहे. म्हणजे संपूर्ण हप्ता काम करायचं आणि विकेंडला आपल्या सहकाऱ्यांसोबत पार्टी करत मजा करायची. मात्र या पार्टीत दारु पिण्याचे प्रमाण वाढले आहे. अशाच एका पार्टीतला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहून तुम्हालाही संताप येईल.
वर्क हार्ड पार्टी हार्डर कल्चरवर प्रश्नचिन्ह
कॅलेब फ्रिसेन नावाच्या व्यक्ती ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली असून बेंगळुरूमध्ये एका पार्टीत मद्यधुंद व्यक्ती अतिशय वाईट अवस्थेत आढळला. त्याने इतकी दारु प्यायली होती की त्याला बसणेही कठीण झाले होते. या व्यक्तिला मदतीची प्रचंड गरज होती मात्र कोणीही सहकारी मित्र त्याच्या मदतीला आले नाहीत. ही गोष्ट जेव्हा त्याच्या सहकाऱ्यांना सांगितली तेव्हा त्यांनीही दुर्लक्ष करत त्याला त्यांच्यापासून लांब ठेवले. सुदैवानं थोड्यावेळानं त्याचे काही सहकारी आले आणि परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्या व्यक्तीला मदत केली.
पाहा पोस्ट –
हेही वाचा – ‘वो स्त्री है कुछ भी कर सकती है’ महिलेचा जुगाड पाहून म्हणाल; काय डोक लावलंय..मानलं बुवा !
या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधलं आहे. वर्क हार्ड पार्टी हार्डर कल्चर हे भारतात नवीन असलं तरी हे फक्त आता बॉलिवुडपुरत मर्यादीत राहीलं नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करताना त्याच्या परिणामांचा विचार केला पाहिजे.