सोशल मीडियावर प्राण्यांच्या विचित्र हालचाली, माणसासारख्या कृती असे व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असतात. नेटकरी असे व्हिडिओ डोक्यावर घेतात. लाइक्स, शेअरिंगचा पाऊस पाडून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक कबूतर मायकल जॅक्सनसारखं मूनवॉक करताना दिसत आहे. नेटकरी हा व्हिडिओ वारंवार पाहात आहेत.
हा व्हिडिओ एका यूजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी कबूतर नक्की काय करणार आहे? याचा अंदाज बांधता येत नाही. मात्र एका सेकंदात, कबूतर आपला वेग पकडतो आणि मायकल जॅक्सनचा मूनवॉक सुरू करतो. तो बराच वेळ या स्टेप्स करतो. कबूतराला पाहून वाटतं की हा एक प्रोफेशनल डान्सर आहे आणि कोणाकडून तरी ट्रेनिंग घेऊन आला आहे. कबूतराचा हा डान्स पाहून प्रत्येक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अवघ्या काही सेकंदाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर हजारो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे.
जु्न्या काळात कबूतराचा वापर संदेश पाठवण्यासाठी केला जात असे. मात्र आता काळ वेगाने बदलला आहे. कबूतर संदेश पाठवत जरी नसले तरी माणसाच्या जवळ राहणारा पक्षी आहे.