सोशल मीडियावर केवळ माणसंच प्रसिद्ध होऊ शकतात, असं काही नाही. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्राण्यांच्या व्हिडीओची तुफान क्रेझ आहे. असाच एक प्राण्यांचा व्हिडीओ व्हायरल होत असून यात एका कासवाला चक्क डुक्करसारखं नाक आहे. डुक्करसारखं नाक असलेलं हे कासव पाहून साऱ्यांना भलतंच आश्चर्य वाटत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयाने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या एका व्हिडीओने लोकांना थक्क करून सोडलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत या विचित्र कासवाबद्दल माहिती सुद्धा शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारा हा कासव हा फ्लाय रिव्हर कासव आहे. या कासवाला डुक्कर सारखं नाक पाहून प्रत्येक जण अचंबित होत आहेत. या कासवाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरूय.

या व्हिडीओमध्ये डुक्कर सारखं नाक असलेलं हे कासव पाण्यात पोहताना दिसून येत आहे. असा दुर्मिळ कासव कदाचितच तुम्ही कधी पाहिला असेल. मात्र, आता या डुक्कर सारखं नाक असलेल्या या कासवाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

बऱ्याच जणांनी हा व्हिडीओ पुन्हा पोस्ट केला आहे. तसेच लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस या व्हिडीओवर पडत आहेत. अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया लिहित असून एका युजरने लिहिलं आहे की,‘आजच्या आधी मी असा व्हिडीओ कधीच पाहिला नव्हता, हे फार मजेशीर आहे’. तर दुसऱ्याने लिहिलं आहे की, ‘असं वाटतं आहे या कासव डुकराची नक्कल करतोय.’

ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयात गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ काम करणारे फ्रेडी यांनी हा विचित्र कासव सगळ्यांच्या समोर आणला आहे. फ्लाय रिव्हर कासव यांना पिग-नोस्ड टर्टल म्हणूनही बोललं जातं. कारण त्यांच्या डुकरासारख्या नाकामुळे त्यांना पाण्याच्या पृष्ठभागावरून श्वास घेता येतो. त्यांचे उर्वरित शरीर हे पाण्यात बुडालेले असतात. त्यामुळे त्यांना पाण्याबाहेरील भक्षकांच्या समोर न येता त्यांच्यापासून सुरक्षित राहणं सोप्प होतं.

अनोख्या कासवाचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीला पडताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत जवळपास दहा हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pignosed turtle swims in water video leaves people in awe prp