Pilibhit Young Man Hanging High Tension Line : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. त्यातील काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतोय. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगा चक्क ११ हजार वोल्टच्या विजेच्या तारांवर उभा राहून झोका खेळताना दिसून येतोय. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स देखील आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडीओमध्ये मुलाने विजेच्या तारांना एखाद्या दोरीप्रमाणेच पकडलं आहे आणि त्यावर अगदी आरामात झुलताना दिसतोय.

वीज म्हटलं की खरं तर अंगावर काटा उभा राहतो. मग ती आकाशात कडाडणारी असो वा आपल्या रोजच्या वापरातील. सर्वसामान्य नागरिक विजेच्या खांबाखाली उभे राहतानाही घाबरतो. पण, विजेच्या खांबावर चढून हा मुलगा चक्क झोका खेळताना दिसून आला. एखादी दोरी पकडावी असं या मुलाने तब्बल ११ हजार वोल्टच्या हायटेंशन लाईन पकडून स्वतःच्याच धुंदीत झुलताना दिसून आलाय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असून ट्विटर, इन्स्टाग्रामवर तो व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून सारेच जण हैराण झाले आहेत. विजेच्या तारांवर झुलत हा मुलगी खाली येतो तर कधी वर जातो. हा व्हिडीओ पाहताना मनात भीती वाटू लागते की, विजेच्या धक्क्याने या मुलाला काही होणार तर नाही ना? पण या मुलाच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती मात्र दिसून येत नाही.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
teacher lost 20 lakh rupees share market
शिक्षकाला वीस लाखांचा गंडा, सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कारवाई
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
46 unauthorized water connections disconnected in Ulhasnagar news
उल्हासनगरमध्ये ४६ अनधिकृत नळ जोडण्या तोडल्या; पुन्हा अनधिकृत जोडणी केल्या गुन्हेही दाखल होणार, पालिकेचा इशारा

आणखी वाचा : VIRAL VIDEO : गाडी फुल स्पीडमध्ये असताना हरणाने इतक्या उंच उडी मारत रस्ता ओलांडला

विजेच्या तारांवर असा धोकादायक स्टंट पाहून लोक आश्चर्य झाले आहेत. तरुण स्टंट करण्यात मग्न होता, तर खाली उभ्या असलेल्या लोकांचा जीव भांड्यात पडला होता. हा प्रकार पाहून तिथल्या लोकांनी ताबडतोब वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून वीज वाहिन्या सुरू करू नका, असं कळवलं. यानंतर वीज विभागाचे कर्मचारी आणि बाजारपेठेतील लोकांनी मिळून बराच वेळ समजूत काढून त्याला खाली उतरवलं.

या मुलाचं नाव नौशाद असं आहे. तो रस्त्यावर बांगडीची गाडी लावतो. शनिवारी तो आपली हातगाडी सोडून पायऱ्यांवरून चढत घराच्या छतासमोरील विजेच्या तारांवर चढला आणि झोका खेळू लागला. या मुलाचं नशीब चांगलं होतं की नेमकं त्याचवेळी पावसामुळे इथल्या परिसरातला वीज पुरवठा बंद होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

आणखी वाचा : आकाशातून इंद्रधनुष्य कसं दिसतं बघायचंय? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

नौशादच्या अशा कृत्याने परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांनी कसंतरी तरुणाला खाली उतरवून त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. हा तरुण कधी कधी असं विचित्र कृत्य करत असतो असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. लोक म्हणाले की तो इथे रोज हातगाडी लावून बांगड्या विकतो, त्याला कधीच असं कृत्य करताना पाहिलं नाही. सध्या नौशाद त्याच्या घरी आहे आणि कोणाला काही सांगत नाही. तो कुणाशी भेटायला तयार होत नाही. त्यामुळे त्याने असे कृत्य का केलं, हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे.

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ऑस्ट्रेलियात १४ व्हेल माशांचा गूढ मृत्यू? ज्यांची उलटी ३० लाखात विकली जाते, कारण जाणून घ्या

याचा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधल्या पीलीभीत जिल्ह्यातली आहे. हा तरूण मनोरूग्ण असल्याचं देखील सांगण्यात येतंय. उदयपूरमधल्या अमरिया परिसरात तो बांगड्यांची हातगाडी लावत होता.

Story img Loader