Pilot Announcement In Punjabi and English Mix : सध्या इंडिगो फ्लाइटचा उड्डाण करण्यापूर्वी केलेल्या अनाउंसमेंटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आता तुम्हीही विचार करत असाल की, फ्लाईटमध्ये केलेल्या अनाउंसमेंटमध्ये इतकं काय विशेष आहे, जे सोशल मीडियावर होऊ लागलंय. खरं तर, देशात पहिल्यांदाच एखाद्या फ्लाइटमध्ये पायलट पंजाबी भाषेत घोषणा करताना या व्हिडीओमध्ये दिसून येतोय. हा व्हिडिओ इंडिगो फ्लाईटचा आहे, जी बंगळूरहून चंदीगडला जात होती. या व्हिडीओमध्ये इंडिगो फ्लाइटमधील पायलट चक्क पंजाबी भाषेत प्रवाशांचं स्वागत करताना दिसून येतोय. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लोकांच्या पसंतीस पडतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, इंडिगो विमानात एक पायलट मायक्रोफोनवर बोलताना आणि लोकांचे स्वागत करताना दिसत आहे. सुरूवातीला पायलट इंग्रजीत बोलताना दिसून येतोय. यावेळी तो म्हणतो की, डाव्या बाजूला बसलेले प्रवासी फ्लाइट दरम्यान फोटोग्राफीचे कौशल्य दाखवू शकतील, तर उजवीकडे बसलेल्यांना हैदराबाद दिसेल. इंग्रजी भाषेतील त्याची ही अनाउंसमेंट ऐकत असताना पुढच्या काही सेकंदात विमानातील प्रवाश्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

आणखी वाचा : VIRAL : अंत्यसंस्कार करताना पार्थीव मध्यभागी ठेवून कुटुंबीयांनी हसत हसत काढला फोटो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

फाडफाड इंग्रजीमधली अनाउंसमेंट सुरू असतानाच अचानक पायलटच्या तोंडून आपली मातृभाषा ऐकू आल्याने विमानातील सारेच पंजाबी भाषिकांना सुरूवातीला आश्चर्य वाटलं. पण नंतर विमानात आपल्या भाषेतून अनाउंसमेंट ऐकू आल्याने सर्व प्रवाश्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला. इंग्रजीमधून अनाउंसमेंट सुरू असताना अचानक पायलट पंजाबी भाषेतून म्हणतो, “डावीकडील प्रवासी जयपूर पाहतील, तर दुसऱ्या बाजूला असलेल्यांना भोपाळ दिसेल.”

आणखी वाचा : या जुन्या विहिरीत आढळले सहा साप, VIRAL VIDEO पाहून अंगावर काटा येईल

पायलट हसला आणि म्हणाला की गॅलरीच्या सीटवर बसलेले लोक फक्त डावीकडे व उजवीकडे वळून एकमेकांकडे पाहू शकतात. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला. कॅप्टनने विनोद केला, “म्हणजे काय? नेहमी विंडो सीट घ्या.” यानंतर त्यांनी संरक्षण, पॅरा मिलिटरी आणि विमानातील सर्व प्रवाशांबद्दल सांगितले. त्यांनी लोकांना त्यांचे मास्क घालण्याचे आणि विमान चंदीगडमध्ये उतरेपर्यंत बसण्याचे आवाहन केले. पायलट म्हणाला, “तुमचे सामान सुरक्षित आहे. कृपया दरवाजे उघडेपर्यंत बसून राहा. तुमचे सामान तुमच्याकडे पूर्णपणे सुरक्षित आहे.”

आणखी वाचा : इवल्याश्या मुंग्यांनी चक्क काठी हलवली, हा VIRAL VIDEO एकीचे बळ दाखवतो…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Ganesh Chaturthi 2022: ३५६ वर्षे जुन्या या अद्भूत मंदिरात मुर्ती अनेकवेळा समुद्रात फेकल्यानंतरही परतून येत होती…

हा व्हिडीओ danvir_chauhan नावाच्या एका ट्विटर यूजरने शेअर केलाय. त्यानंतर या व्हिडीओने सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला. हा व्हिडीओ तेजीने व्हायरल होत आतापर्यंत या व्हिडीओला ५० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १,९०० पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत. एका यूजरने लिहिले, “चंदीगडला अनेक फ्लाइट्सने प्रवास केला, पण हा कॅप्टन कधीच मिळाला नाही!!! काय उपयोग?” दुसरा म्हणाला, “विलक्षण आणि सुंदर केले… मला त्याच्या फ्लाइटवर जायला आवडेल.”