विमान हवेत झेपावताना आणि ते रनवेवर सुरक्षित लँड करताना वैमानिकाचे खरे कसब पणाला लागते. हवेत झेपावलेले विमान जमीनीवर आणणे कौशल्याचे आणि अतिशय जोखमीचे काम. यात जराही चुक झाली तर मात्र वैमानिकाच्या जीवाला धोका असतोच पण सहप्रवाशांचे जीव देखील जाऊ शकतात. अनेकदा विमान अपघात हे लँडींगच्यावेळीच होतात. पण विल रॉजर एअरपोर्टवर असा अपघात होता होता टळला. ऐनवेळी लँडींग गिअर बाहेर न आल्याने मागच्या चाकावर भिस्त राखत या वैमानिकाने विमान विमानतळावर आणले.
बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास विल रॉजर एअरपोर्टवर ‘किंग एअर बी २००’ हे विमान उतरले. लँडींग आणि टेक ऑफच्या वेळी विमानातून लँडींग गिअर म्हणजे विशिष्ट चाके बाहेर येतात. पण हे विमान लँड होत असताना पुढचे लँडींग गिअर ऐनवेळी बाहेर आलेच नाही. लँडींग गिअर काम करत नसल्याने त्याने हवाई वाहतूक विभागाला कळवले पण या वैमानिकाने लँडींग गिअरविनाच आपले विमान रनवेवर उतरवले. रनवेवर काही दूर अंतरावर हे विमान मागच्या चाकाच्यासाह्याने पुढे सरकले पण नंतर मात्र विमानाची पुढची चाके वेळेत बाहेर न आल्याने विमानाच्या टोकाचा भाग काही दूर अंतरापर्यंत घासत गेला. सुदैवाने मात्र वैमानिक वाचला. या लँडींगमुळे विमानाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. विमान जमिनीवर चालण्यासाठी लँडींग गिअर हे महत्त्वाचे असतात. जेव्हा विमान हवेत झेपावते तेव्हा ही चाके आत जातात. जर वेळीच ही चाके बाहेर आली नाहीत तर मात्र मोठी दुर्घटना होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा