Daughter Became Pilot VIral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. काही व्हिडीओ असे असतात, जे पाहिल्यानंतर आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. तर काही व्हिडीओ असेही असतात, ज्यांना पाहिल्यावर आपल्याला मनापासून आनंद होतो. इंटरनेटवर अशाच प्रकारचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आई-वडीलांना नेहमीच वाटतं की, मुलांनी यशाचं उंच शिखर गाठण्यासाठी गरुडझेप घ्यावी. आईचा माया आणि वडीलांचा आशिर्वाद पाठीशी असेल तर अशक्य गोष्टी सहज सोप्या वाटू लागतात. एका तरुणीनेही आई-वडीलांच्या आशिर्वादाने यशाची उत्तुंग भरारी घेतली आहे. कॅप्टन कृतज्ञा हाले असं या तरुणीचं नाव आहे. वैमानिक बनल्यानंतर विमानाच्या उड्डाणाआधी या तरुणीने वडीलांचा आशिर्वाद घेतला. लेकीचं वडीलांवर असलेलं प्रेम पाहून नेटकऱ्यांचेही आनंदाश्रू तरळले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओनं लाखो नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

तरुणी आपल्या वडीलांचा आशिर्वाद घेताना या व्हिडीओत दिसत आहे. वडील त्यांच्या मुलीला गळाभेट देऊन आशिर्वाद देत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना मनस्वी आनंद झाला आहे. जगातील सर्व आई-वडीलांना वाटतं की, त्यांच्या मुलांनी आयुष्यात यशस्वी व्हावं. वडीला आपल्या मुलांच्या उत्तम भविष्यासाठी नेहमीच मेहनत घेत असतात. मुलंही त्यांच्या आई-वडीलांना खूष ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

नक्की वाचा – Viral News : विमानतळावर लगेजमधून हरवलेली सुटकेस Tiktok मुळे 4 वर्षांनंतर सापडली, महिला म्हणाली,” मी खूप…”

इथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ pilot_krutadnya या इन्स्टाग्रामवर शेअर करण्याता आला आहे. या व्हिडीओला कॅप्शनही देण्यात आलं आहे. कॅप्शन वाचून लोकांना आनंद झाला असून पायलट तरुणीला आशिर्वाद देत आहेत. या व्हिडीओला २० लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर पाच लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाल्यानं तमाम नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओनं नेटकऱ्यांच्या मनावर अधिराज्यच गाजवलं आहे. कारण आई-वडीलांच्या आशिर्वादाने या तरुणीने आयुष्यात घेतलेली उंच भरारी अनेकांना प्रेरणा देणारी आहे. वैमानिक बनलेल्या या तरुणीवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करताना सोशल मीडियावर दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pilot daughter takes blessing from her father before flights take off viral video on instagram wins lacs of netizens hearts nss