अलीकडेच, अलास्का एअरलाइन्सच्या विमानाची खिडकी उड्डाना दरम्यान हवेत असतानाच तुटली. हवेच्या दबावामुळे खिडकीसह एक सीटही उखडून गेले. या घटनेच्या व्हिडिओने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खळबळ उडवून दिली आहे. या विमानात सुमारे १८० प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर विमान ओरेगॉन येथे आपातकालिन स्थितीमध्ये सुरक्षितपणे उतरवण्यात आले. या दुर्घटनेतून सर्व प्रवासी सुखरूप बाहेर आले असले तरी त्यांच्यासाठी हा प्रसंग खूपच भीतीदायक होता. अशीच एक घटना अनेक वर्षांपूर्वी १९९० मध्ये घडली होती ज्यामध्ये पायलटच्या शेजारील खिडकी उडाली होती. हवेच्या दबावामुळे पायलटचे डोके देखील विमानाच्या बाहेर गेले होते. त्याने आपले पाय विमानाला अडकवून ठेवले होतो ज्यामुळे तो पूर्णपणे खिडकीबाहेर फेकला गेला नाही. जवळपास २० मिनिटे तो पायलट तसा खिडकीमध्ये लटकत होता. इतक सगळं घडूनही त्या पायलटचा जीव वाचला. या घटनेचा संपूर्ण किस्सा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
बर्मिंगहॅमहून मलागाला जात होते विमान
१० जून १९९० रोजी ब्रिटीश एअरवेज फ्लाइट 5390 चे प्रवासी बर्मिंगहॅमहून मलागासाठी निघाले होते, तेव्हा ते एका भयानक घटनेचे साक्षीदार होणार आहेत याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, “घटनेच्या दिवशी विमानात प्रवाशांची संख्या चांगली होती. विमानात ८१ प्रवासी आणि ६ क्रू सदस्यांसह एकूण ८९ लोक उपस्थित होते. विमानाने बर्मिंगहॅमहून स्थानिक वेळेनुसार८:२० वाजता उड्डाण केले.
उड्डानानंतर अवघ्या १३ मिनिटांत विमानाने १७३०० फूट उंची गाठली. ८.३३ च्या सुमारास विमान ऑक्सफर्डशायरच्या डिडकोटवरून उड्डाण करत असताना कॅप्टन टिमोथी लँकेस्टरच्या बाजूची खिडकीखूप मोठ्या आवाज करत अचानक तुटली आणि पडली. खिडकी तुटल्यामुळे झालेल्या हवेचा दाब कमी झाल्यामुळे कॅप्टन लॅकस्टर विमानाबाहेर फेकला गेला. सुदैवाने, त्याचे पाय विमानातील कंट्रोलमध्ये अडकले आणि विमानातून पूर्णपणे बाहेर फेकण्यापासून वाचला. मात्र, त्यामुळे विमानाची ऑटोपायलट यंत्रणा बंद पडली.
को-पायलटने घेतला विमानाचा ताबा
को-पायलट अॅलिस्टर ऍचेसन यांनी तात्काळ ऑक्सिजन मास्क घातला आणि विमानाचा ताबा घेतला. यावेळी, फ्लाइट डेकवर उपस्थित असलेल्या स्टीवर्ड निगेल ओग्डेनने खुर्चीच्या मदतीने कॅप्टन लँकेस्टरचे पाय धरून त्याला आधार दिला. यानंतर दुसरा सदस्य सायमन रॉजर्स पायलटच्या सीटवर बसला, सीट बेल्ट लावला आणि कॅप्टनला पकडले, ज्यामुळे ओग्डेनची थोडा मदत झाली. खरंतर कॅप्टनला वाचवताना ओग्डेनच्या हाताला दुखापत झाली होती.
हेही वाचा – चुकीचं इंग्रजी ऐकून वडिलांनीच केली लेकीची थट्टा! म्हणे,”माझे पैसे…”; Whatsapp Chat झाले व्हायरल
क्रू मेंबर्सच्या मदतीने कॅप्टन लँकेस्टरने विमान उतरेपर्यंत पकड राखण्यात यश मिळविले. या वेळी इतर क्रू मेंबर्सनी प्रवाशांचे सांत्वन केले आणि त्यांना सीट बेल्ट बांधण्याच्या सूचना दिल्या. न्यूयॉर्क पोस्टनुसार, “कॅप्टन लँकेस्टर, ज्यांना या घटनेमुळे कोपर फ्रॅक्चर झाली आणि मानसिक धक्का बसला होता, त्यांना साउथेम्प्टन जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
एक्स(ट्विटरवर ) @fasc1nate या पेजवर या घटनेचा संपूर्ण किस्सा सांगितला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांच्या विविध प्रतिक्रिया पोस्टवर येत आहे.