सोशल मीडियावर विमान प्रवासाशी संबंधित वेगवेगळ्या बातम्या वाचायला मिळतात. यामध्ये कधी प्रवाशांनी एकमेकांशी केलेलं भाडणं असो वा कधी पायलटने केलेली भन्नाट अनाऊन्समेंट, अशा अनेक बातम्या आपण पाहात आणि वाचत असतो. पण सध्या अशी एक विचित्र घटना समोर आली आहे, जी कदाचित याआधी तुम्ही कधी वाचली नसेल. ती बातमी म्हणजे अलास्का एअरलाइन्सच्या विमानातील पायलटने चालू विमानाचे इंजिन बंद करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र, सुदैवाने योग्यवेळी क्रू मेंबर्संनी पायलटला कॉकपिटच्या बाहेर काढल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे आणि पायलटने हवेत इडणाऱ्या विमानाचा दरवाचा उघडण्याचा प्रयत्न पायलटने का केला? ते जाणून घेऊया.

न्यूज एजन्सी एएफपीनुसार, घटनेतील विमानाचे पोर्टलँडमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यानंतर पायलट जोसेफ इमर्सनला अटक करण्यात आली आहे. फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या ८३ प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी इमर्सनला अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध प्रवाशांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चौकशी केली असता, इमर्सनने सांगितलं, “मला वाटले की मी स्वप्न पाहत आहे.”

हेही वाचा- आजारपणाच्या सुट्ट्या घेतल्या म्हणून कर्मचाऱ्याला कामावरुन काढणं कंपनीला पडलं महागात, कोर्टाने ठोठावला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा दंड

रिपोर्टनुसार, इमर्सनने पोलिसांना सांगितले की, त्याने मॅजिक मशरूम खाल्ले होते. त्यामुळे तो नर्व्हस ब्रेकडाऊनचा बळी ठरला. नर्व्हस ब्रेकडाउनमध्ये, एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागते आणि त्याचे मन अस्थिर होते, इतकंच नाही तर अशी व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवर तासनतास रडायला सुरुवात करते. तसेच एकटेपणा जाणवतो आणि मनात खूप नकारात्मक विचार मनात येतात. धक्कादायक बाब म्हणजे आपण मागील ४० तासांपासून झोपलो नव्हतो असंही पायलटने पोलिसांना सांगितलं.

विमान हवेत असतानाच दरवाजा उघडला –

पायलट जेव्हा विमानातून प्रवास करत होता तेव्हा त्याने इमर्जन्सी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र क्रू मेंबर्सनी त्याला तसं करण्यापासून रोखलं. इमर्सनने सांगितलं, “मी दोन्ही इमर्जन्सी दरवाजे ओढले. कारण मला वाटलं की मी स्वप्न पाहतोय आणि घरातील दरवाजा उघडतोय.” सुदैवाने विमानाचे इंजिन थांबले नाही आणि क्रू मेंबर्सनी पायलटला कॉकपिटच्या बाहेर काढलं. दरम्यान, अलास्का एअरलाइन्सने इमर्सनला सेवेतून अनिश्चित काळासाठी काढून टाकले असून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी न्यायालयीन सुनावणीदरम्यान पायलट इमर्सनने निर्दोष घोषित करण्याची विनंती केली. विमानात झालेला अपघात मी आजारी असल्याने घडल्याचेही त्याने कोर्टात सांगितलं.

Story img Loader