Viral video: बाप आणि मुलीचं नातं खूप गोड असतं, वडिलांसाठी मुलगी ही स्वतःच्या जिवापेक्षा मुलगी महत्त्वाची असते. तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये बाप-लेकीचं नात पाहायला मिळतं. मुलीच्या डोक्यावर वडिलांची सावली असणे ही जगातील सर्वात मोठी ताकद आहे, असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये वडील आणि मुलीच्या नात्याचे सौंदर्य दाखवण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुलगी आणि वडील यांचे नाते हे अतिशय खास नाते असते. या नात्यात एकप्रकारचा गोडवा असतो. वडिलांसाठी मुलगी ही राजकन्येपेक्षा कमी नसते. प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांना बालपणात एक सुपरहिरो म्हणून पाहते. मुलीला वाटत असते की आपला बाप काहीही करू शकतो. कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर ते फक्त तिचे वडिल असतात. एखाद्या वडिलांसाठी त्यांची मुलगी खास असते तेवढंच एका मुलीसाठी तिचे वडिलही खूप स्पेशल असतात. दोघांच्या या नात्याचे अनेक उदाहरणं, फोटो, व्हिडीओ आपण पाहिले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका वडिलांनी कर्तव्याबरोबरच आपली जबाबदारीही चोख पार पाडली आहे. विमानातील एका पायलटचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

हा व्हिडीओ पाहून तुम्हीही या व्यक्तीचं कौतुक कराल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, पायलट असलेले वडील आपल्या लहान परीसारख्या मुलीला घेऊन फ्लाइटमध्ये घोषणा करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ एका साउथवेस्ट एअरलाइन्सच्या पायलटचा आहे ज्याने आपल्या लहान मुलीला एका हातात धरले आहे आणि दुसरीकडे तो घोषणा करताना म्हणत आहे, “मी तुमचा फर्स्ट ऑफिसर बेनशी बोलत आहे, जो तुम्हाला डेन्व्हरला घेऊन जाईल. ही फ्लाईट माझ्यासाठी खूप खास आहे कारण, आज या फ्लाईटमध्ये माझी मुलगीही आहे. पायलट म्हणून मी माझ्या मुलीसोबत पहिल्यांदा विमान चालवत आहे. पायलट बेन पुढे म्हणाले की, ती सर्वात आनंदी मुलींपैकी एक आहे, जी नेहमी आनंदी असते आणि कधीकधी त्रासही देते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> घराबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेला कारनं चिरडलं; एक धडक अन् जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTVत कैद

साउथवेस्ट एअरलाइन्स नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत सुमारे २० दशलक्ष लोकांनी पाहिले आहे. त्यावर यूजर्स त्यांच्या प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले…मला त्या फ्लाइटमध्ये जास्त सुरक्षित वाटेल. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, म्हणूनच मला साउथवेस्ट एअरलाइन्स आवडतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pilot makes sweet announcement during his first flight with baby daughter on board watch video srk