बेल्जियममध्ये एका विमानाचा मोठा अपघात होता होता टळला. विमानाचे लँडिंग होत असताना अचानक क्रॅश झाला आणि पायलटने प्रसंगावधान दाखवत जे केलं ते पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. विमान क्रॅश झाल्यानंतर पायलटने पॅराशूट खुलं करून विमान त्याला लटकवलं आणि हळुहळू जमिनीवर उतरवत आपला जीव वाचवलाय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. पायलटने हिमतीने जे प्रसंगावधान दाखवलंय लोक त्याचं भरभरून कौतूक करताना दिसत आहेत.

व्हायरल हॉगने त्यांच्या यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक पॅराशूट हवेत उडताना दिसून येत आहे. जसजसं हे पॅराशूट खाली येतंय तसतसं सगळं दृश्य थक्क करणारं आहे. या पॅराशूटला एक क्रॅश झालेला विमान लटकत असलेला दिसून येतोय. लाल आणि पांढऱ्या पॅराशूटच्या छताखाली लटकलेले छोटे विमान वाऱ्यात एका बाजूला झुलताना दिसत आहे. जमिनीच्या जवळ येत असताना ते वेगाने खाली येताना दिसत आहे.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
Cylinder explosion in Badlapur one injured
Cylinder explosion : बदलापुरात सिलेंडरचा स्फोट, एक जखमी
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
Leopard attacks Viral Video
‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप

आणखी वाचा : इतक्या मोठ्या पाळण्यात हा लहान मुलगा एकटाच बसला होता, VIRAL VIDEO पाहून नेटकरी पालकांवर संतापले

व्हिडीओच्या शेवटी ब्रुग्सच्या सिंट-अँड्रीजमधील रस्त्याच्या कडेला विमान सुरूवातीला उतरत असताना मोठा आवाज सुद्धा ऐकू येतो. स्काय न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, ब्रुग्स पोलिसांनी माहिती दिली की, दोन आसनी विमानाच्या क्रॅशमुळे परिसरात कमीत कमी नुकसान झाले आहे. वैमानिकही विमान अपघातातून सुखरूप होऊन बाहेर पडण्यात यशस्वी झाला. आता किरकोळ दुखापतींमुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : डोक्यावर इमारतीचा भाग कोसळणार तितक्यात जिगरबाज बापाने जीवाची बाजी लावून लेकाला वाचवलं…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : रस्त्यावर चालताना दिसून आला हा रहस्यमयी प्राणी, हा VIRAL VIDEO सारेच जण आश्चर्यचकित

अधिकाऱ्यांनी पायलटचे प्रसंगावधान पाहून ‘अनुभवी फ्लायर’ म्हणून कौतूक केलं आहे. पॅराशूट लाँच करणाऱ्या विमानाच्या बॅलिस्टिक रिकव्हरी सिस्टम (BRS) द्वारे त्याचे जीवन वाचू शकले. आता विमान प्राधिकरणाने अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केला आहे. न्यूझीलंड हेराल्डने स्वतंत्रपणे नोंदवले की या घटनेत सहभागी असलेले विमान डायनएरो एमसीआरओ १ होते . कार्बन फायबरपासून बनवलेले दोन आसनी हलके विमान या घटनेत क्रॅश झाले होते.

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ पाहून सारेच जण पायलटचे कौतूक करताना दिसत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत २६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत.

Story img Loader