आई वडिलांचं बोट धरून चालायला शिकलेल्या लेकरांची जेव्हा गरुड झेप घेण्याची वेळ येते तेव्हा त्या पालकांच्या डोळ्यात दिसणारा अभिमान निराळाच असतो. मोठं झाल्यावर मुलांनी आपल्याला अभिमान वाटेल असं काही करावं असं पालकांना कायम वाटत असतं. बुहताश वेळा मुलंही तसा प्रयत्न करतात आणि आपल्या आई वडीलांच्या कष्टाचे चीज करुन दाखवतात. आपल्या मुलाला अमुक एखाद्या पदावर किंवा हु्द्यावर पाहून आई वडीलांना आनंदच होत असतो. अशाच एका आई आणि मुलाचा विमानातील भावनिक व्हिडीओ सध्या सोश मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात नक्की पाणी येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पायलटच्या विशेष घोषणेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.युनायटेड एअरलाइन्सच्या पायलटने त्याच्या फ्लाइट अटेंडंट आईसाठी ही घोषणा केली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता आई विमानात बसली तिला कळले आपला लेकच पायलट आहे. यावेळी पायलट लेकानं आईसाठी खास अनाउंसमेंट केली आहे. पायलटने सांगितले की ते दोन वर्षांत प्रथमच एकत्र काम करणार आहेत.व्हिडिओमध्ये, विमान उड्डाण करण्यापूर्वी पायलट प्रवाशांना संबोधित करतो. तो हवामानाच्या परिस्थितीसारख्या आवश्यक गोष्टी सांगतो त्यानंतर फ्लाइट अटेंडंट असलेल्या त्याच्या आईमुळे हे विमान उड्डाण त्याच्यासाठी कसे खास आहे हे तो पुढे सांगतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – ‘फिश स्पा’ करणे तरुणीच्या अंगलट; एका चुकीमुळे कापावी लागली पायाची पाचही बोटे, VIDEO व्हायरल

या दोघांचा हा क्षण कॅमेरात कैद झाला असून तो पाहून काही क्षणांसाठी आपल्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. लाखो जणांनी आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला असून आतापर्यंत जवळपास ८५ हजारहून अधिकांनी तो लाईक केला आहे. यावर नेटीझन्सनी भावनापूर्ण कमेंटस केल्या असून आईच्या प्रेमापुढे काहीच नाही, हृदय हेलावून टाकणारा क्षण, मुलाच्या कामगिरीचा अभिमान असलेली आई असे लिहीले आहे. या दोघांना पाहून विमानातले इतर प्रवासीही खूश होतात आणि त्यांच्या आनंदात सामील होतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pilots heartwarming surprise for flight attendant mom goes viral hes a gem says internet man makes special announcement for his flight attendant mom in heartwarming video viral srk