लहानपणी आपण सगळेच स्वप्न पाहतो. कोण म्हणतं डॉक्टर व्हायचंय, कोण म्हणतं शिक्षक व्हायचंय तर कोणी म्हणतं पायलट व्हायचंय. असंच स्वप्न एका तरुणानं वयाच्या ५ व्या वर्षी पाहिलं. ५ वर्षाचा असताना या मुलानं आईला मला पायलट व्हायचंय असं सांगितलं आणि २१ वर्षानंतर हे स्वप्न त्यानं पूर्ण करुन दाखवलं. मुलानं आईला हटके सरप्राईज दिलंय, ज्या विमानानं आई प्रवास करणार असते त्याचं विमानाचा पायलट म्हणून मुलगा आईचं स्वागत करतो. यावेळी आईला इतका आनंद होतो की तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले.
आपल्या मुलाला अमुक एखाद्या पदावर किंवा हु्द्यावर पाहून आई वडीलांना आनंदच होत असतो. अशाच एका आई आणि मुलाचा विमानातील भावनिक व्हिडीओ सध्या सोश मीडियावर व्हायरल होत आहे. आई वडिलांचं बोट धरून चालायला शिकलेल्या लेकरांची जेव्हा गरुड झेप घेण्याची वेळ येते तेव्हा त्या पालकांच्या डोळ्यात दिसणारा अभिमान निराळाच असतो. असाच अभिमान या व्हिडीओमध्ये आईच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आई आणि पायलट तरुणाचा भाऊ प्रवासासाठी विमानात येत आहेत. यावेळी त्या दोघांनाही कल्पना नाही की आपला मुलगाच किंवा भाऊच या विमानाचा पायलट आहे. जसे ते आतमध्ये येतात तसं त्यांना मुलगा दिसतो आणि त्यांनतर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. लेकाला पाहून आईला अश्रू अनावर झाले. मुलगाही आईला आणि भावाला सरप्राईज देऊन खूप खूश झालेला दिसत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “खोया खोया चांद” मुंबईच्या रस्त्यावर रिक्षा ड्रायव्हरचं अनोखं टॅलेंट; VIDEO पाहून सुप्रसिद्ध संगीतकाराने घेतली दखल
या दोघांचा हा क्षण कॅमेरात कैद झाला असून तो पाहून काही क्षणांसाठी आपल्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. यावर नेटीझन्सनी भावनीक कमेंटस केल्या असून आईच्या प्रेमापुढे काहीच नाही, हृदय हेलावून टाकणारा क्षण, मुलाच्या कामगिरीचा अभिमान असलेली आई असे लिहीले आहे. या दोघांना पाहून विमानातले इतर प्रवासीही खूश होतात आणि त्यांच्या आनंदात सामील होतात.