Pink Lake Burlinskoye: इंटरनेटवर समोर येणाऱ्या काही व्हिडीओज इतके थक्क करणारे असतात, जे अजूनही निसर्गात अनेक रहस्य दडली आहेत याची जाणीव करून देतात. सुंदर रंगांनी बहरलेली आपली सृष्टी नेहमीच तिच्या सौदर्यांने सर्वांना आकर्षित करत असते. निसर्गाचे असेच सौंदर्य दर्शवणार एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. दरम्यान समोर आलेल्या व्हिडीओ पाहून तलावाचे पाणी गुलाबी रंगाचे आहे हे पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. तलावाचा असा रंग कदाचित तुम्ही कधीही पाहिला नसेल. खरंच या पाण्याच्या गुलाबी रंगामागे एक रहस्य दडले आहे.
सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर)वर हा व्हिडीओ TruongPham नावाच्या अकांउटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओत तलावाचेच्या पाण्यामधून एक ट्रेन जाताना दिसत आहे. या तळ्याचे पाणी निळा, पांढरा किंवा हिरवा नाही तर चक्क गुलाबी रंगाचे असल्याचे दिसते आहे. गुलाबी पाण्यातून जाणारी ट्रेन पाहून लोक थक्क झाले आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीओला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. अनेक लोक कमेंट करून आश्चर्य व्यक्त करत आहे. खरंतर हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये पाण्याचा रंग असा का आहे याचे कारण सांगितले आहे.
हे पाणी गुलाबी आहे.
खरं तर रशियामध्ये सायबेरिया येथील अल्ताई पर्वत क्षेत्रात हे गुलाबी पाण्याचे बर्लिंस्कॉय लेक (Pink Lake Burlinskoye)नावाचे तळे आहे. या तलाव पाणी खारट आहे पण दरवर्षी ऑगस्टमध्ये रहस्यमयी पद्धतीने हे पाणी गुलाबी रंगाचे होते. शास्त्रज्ञांचे मत आहे की, बर्लिस्कॉय तलावात पाण्याचा हा रंग आर्टेमीया सलीना नावाच्या गुलाबी रंगाच्या सुक्ष्मजीवांमुळे होतो. ते पाण्याच्या खालीच असतात. आर्टेमीया सलीन ही एक खारी झिंगाच्या एक प्रजाती आहे ज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काही बदल झालेला नाही.