हिरे हे अत्यंत महाग असतात हे सर्वज्ञात आहे, पण जगातल्या सगळ्यात दुर्मिळ अशा हि-याची दोन दिवसांपूर्वीच लिलाव करण्यात आला. या लिलावाची किंमत ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसेल हे नक्की. तब्बल ४६२ कोटींना या दुर्मिळ गुलाबी हि-याची विक्री करण्यात आली. हाँगकाँगमधील सोदबी ऑक्शनमध्ये या हि-याचा लिलाव पार पडला. चॉव ताई फूक इन्टरप्रायझेसने तब्बल ४६२ कोटी एवढी मोठी रक्कम मोजून हा महागडा हिरा विकत घेतला आहे.

अंडाकृती आकाराचा हा गुलाबी हिरा ५९. ९ कॅरेटचा आहे, लिलाव सुरू झाल्यानंतर पहिल्या पाच मिनिटांत त्याचा विक्रमी लिलाव झाला. डी बीयर्सने १९९९ मध्ये आफ्रिकेच्या बोत्सवानामधील खाणीतून हा हिरा शोधला होता. यानंतर स्टेनमेत्ज डायमंड्सने दोन वर्षात त्याला पैलू पाडून चमकावलं. सुरुवातीला हा हिरा १३२.५ कॅरेटचा होता. पण पैलू पाडून आणि पॉलिश करुन तो ५९.०६ कॅरेटचा झाला. आतापर्यंतचा हा सर्वात दुर्मिळ असा गुलाबी हिरा असून सर्वाधिक बोली लावलेला हिरा असल्याचेही म्हटले जात आहे. २००३ मध्ये पहिल्यांदा जिनेव्हाच्या स्मिथसोनियन राष्ट्रीय संग्रहालयात हा हिरा प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. ज्या चॉव ताई फूक इन्टरप्रायझेसने हा हिरा खरेदी केला आहे त्याच्या ८८ वी वर्षपूर्ती आहे, म्हणूनच त्यांनी हा बहुमुल्य हि-याची खरेदी केली असल्याचे समजते आहे.

Story img Loader