Pitbull Dogs Attack Delivery Man Video Goes Viral : काही काळापासून पिटबुल जातीच्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या अनेक भयानक घटना एकामागून एक समोर येत आहेत. नुकताच छत्तीसगडमधून पुन्हा एकदा असाच काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमचाही थरकाप उडेल. १२ जुलै रोजी रायपूरमधील एका बंगल्यात एका डिलिव्हरी बॉयवर दोन पिटबुल कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला. ते कुत्रे डिलिव्हरी बॉयच्या हात-पायांना अशा प्रकारे चावले की, तो रक्तबंबाळ अवस्थेत जीव वाचविण्यासाठी बाहेर पळाला. हात-पायांतून रक्त वाहत असतानाही जीव वाचवण्यासाठी तो एका गाडीवर चढला. या थरारक घटनेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, एक डिलिव्हरी बॉय बंगल्याचे गेट उघडून फूड पॅकेट टाकण्यासाठी म्हणून घरात प्रवेश करीत असतो, त्यावेळी अचानक दोन पिटबुल कुत्रे त्याच्या पायांवर हल्ला करतात. दरम्यान, तो आपल्या उजव्या हाताने कुत्र्यांना दूर ढकलण्याचा प्रयत्न करीत असतो; पण त्या दोन कुत्र्यांपैकी एक त्याच्या हाताला जोरात चावतो. अखेर तो डिलिव्हरी बॉय कशीबशी त्या कुत्र्यांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतो आणि घाबरत एका कारवर जाऊन बसतो. यावेळी त्याच्या हात-पायांतून रक्ताची धार लागल्याचे दिसत आहे. दरम्यान, व्हिडीओ शूट करणाऱ्या महिलेकडे पाहून तो रडून ओरडत, “मला वाचवा”, असे म्हणत होता.

कमजोर हृदयाच्या लोकांनी पाहू नये हा व्हिडीओ

हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वेदनांनी ग्रासलेला डिलिव्हरी बॉय ‘वाचवा मला वाचवा’ म्हणत मदतीची याचना करताना दिसत आहे.

ही घटना छत्तीसगडच्या रायपूरच्या अनुपम नगरमधील असल्याची माहिती मिळाली आहे. सलमान खान असे त्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. तो एका महिला डॉक्टरकडे काही सामान पोहोचवण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याने बंगल्याचा दरवाजा उघडताच तिथे असलेल्या दोन पिटबुल कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्यानंतर एक मुलगी डिलिव्हरी बॉयच्या मदतीसाठी धावत येतो आणि स्थानिकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करतो.

More Trending Stories Read Here : एकमेकांचे कपडे पकडले मग बुक्के मारून…; मेट्रोत दोन पुरुषांची हाणामारी; VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी या धोकादायक प्रजातीच्या कुत्र्यांच्या मालकांना अशा प्रकरणात तुरुंगात पाठविण्याची मागणी केली आहे. सध्या या प्रकरणी कुत्र्याचा मालक अक्षत राव याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे; पण त्याची पाच हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.

भारत सरकारने अलीकडेच भारतात पिटबुल आणि इतर २३ धोकादायक कुत्र्यांच्या जातींच्या विक्री आणि प्रजननावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक युजर्स आता संबंधित कुत्र्यांच्या मालकाला कडक शिक्षा आणि दंड ठोठावीत पीडिताला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करीत आहेत.

व्हिडीओ पाहणाऱ्या एका युजरने लिहिले, “गरीब डिलिव्हरी बॉय, आशा आहे की, त्याला योग्य उपचार मिळतील. उपचाराचा संपूर्ण खर्च मालकाने उचलावा.” आणखी एका युजरने लिहिले, “सरकारने धोकादायक कुत्र्यांच्या मालकांवर कारवाई करावी.” तिसऱ्या युजरने लिहिले, “कुत्र्यांच्या मालकाला तुरुंगात पाठवा. किमान पाच लाख रुपयांचा दंड आणि जखमीला १० लाख रुपयांची भरपाई मिळावी.”