केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. पियुष गोयल नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतात. असाच एक वंदे भारत ट्रेनचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. वंदे भारत एक्सप्रेस गाड्या जेव्हापासून प्रवाशांच्या सेवेत आल्या आहेत तेव्हापासून वंदे भारत चर्चेत आहे. पियुष गोयल यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये वंदे भारत एक्सप्रेस ग्रामीण भागातून अगदी स्वच्छ जलाशयाच्या बाजूनं जाताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिलं तर आजुबाजुचा निसर्ग डोळ्यांना सुखावून टाकणारा आहे. कंटाळवाणा आणि लांबच्या प्रवासासाठी ही ट्रेन अतिशय आरामदायी आहे.
पाहा व्हिडीओ –
वंदे भारत एक्सप्रेसचा व्हिडीओ शेअर करत पियुष गोयल यांनी ‘अनस्टॉपेबल वंदे-भारत’ असं कॅप्शन दिलं आहे. ही पोस्ट आत्तापर्यंत 12 लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिली असून पोस्ट केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनीही ट्विटरवर शेअर केली आहे.
काय आहेत वंदे भारतमध्ये सुविधा पाहुयात
- या ट्रेनमध्ये प्रत्येक सीटसाठी स्वतंत्र मोबाईल चार्जिंगची सुविधा
- या ट्रेनमध्ये चेअर कार आणि एक्झिक्यूटिव्ह कार अशा दोन प्रकारच्या बोगी
- लोणावळा घाटासह विविध दृश्य पाहण्यासाठी रोटेट चेअरही आहे
- जेवण किंवा नाश्ता करण्यासाठी फोल्डेबल कॉम्पॅक्ट टेबल