Plane Crashes Into Sea Video Viral : आकाशात भरारी घेतलेलं विमान समुद्रात कोसळल्याची दुर्देवी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायर येथील प्रसिद्ध हॅम्पटन समुद्र किनाऱ्यावर एक बॅनर विमान (Banner Plane) पाण्यात कोसळलं. विमानात असलेल्या पायलटला वाचवण्यासाठी आणि विमान पाण्यातून बाहेर काढण्यासाठी लाईफगार्ड्सने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हॅम्पटन पोलीस प्रमुख एलॅक्स रेनो यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, अपघातादरम्यान विमानात फक्त पायलट एकमेव प्रवासी होता. अपघात कशामुळे घडला, याचा तपास सुरु आहे. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने विमान समुद्रात कोसळलं अशी प्राथमिक माहिती आहे.
विमान दुर्घटनेचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने ६२ हजांराहून अधिक लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. एका इन्स्टाग्राम यूजरने या व्हिडीओला प्रतिक्रिया देत म्हटलं की, चमत्कार घडत असतात. सुरक्षा आणि संरक्षणासाठी देवाचं आभार. न्यू हॅम्पशायर बीच पेट्रोलिंग टीमने म्हटलं की, आम्हाला आमच्या लाईफगार्ड्सवर गर्व आहे. समुद्रात कोसळलेल्या विमानापर्यंत पोहोचायला लाईफगार्ड्सला ५७ सेकंदाचा वेळ लागला. आमची टीम दिवसरात्र मेहनत करत असते.
नक्की वाचा – Optical Illusion: फोटोत ससा दिसतोय का? पण तो ससा नाही, एकदा क्लिक करून नीट पाहा
इथे पाहा थरारक व्हिडीओ
इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टला कॅप्शन देत म्हटलं की, एक बॅनर विमान हॅम्पटन समुद्र किनाऱ्यावर कोसळलं होतं. या घटनेची माहिती मिळताच आमची संपूर्ण टीम घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर समुद्रात जाऊन पायलटला वाचवलं आणि अपघातग्रस्त विमानाता समुद्राच्या पाण्यातून किनाऱ्यावर आणलं.