Viral Video : विमान अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही फोटो किंवा व्हिडीओ इतके धक्कादायक असतात की पाहून अंगावर शहारा येतो. सध्या असाच एक विमान अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विमान समुद्रात कोसळताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की समुद्रकिनारी अनेक लोक आहेत. अचानक एक विमान किनाऱ्याच्या दिशेने येत असते पण किनारपट्टी येण्यापूर्वीच ते समुद्रात कोसळते. विमान कोसळताचकिनाऱ्यावरील लोक सैरावैरा पळतात. व्हिडीओत फक्त एक तरुणच विमानाच्या दिशेने धावताना दिसत आहे जेणेकरुन कुणाला वाचवता येईल. हा व्हिडीओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा येऊ शकतो.
kamron_trolla या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी माणूसकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. एका युजरने लिहिलेय, “फक्त एक तरुण विमानातील लोकांना वाचवण्यासाठी मदतीला धावला. बाकीचे फक्त बघत आहे.” तर एका युजरने विचारले, “विमानातील सर्व जण सुखरूप आहेत का? आणखी एका युजरने लिहिलेय, “असा अपघात कधीही होऊ नये, हीच देवाजवळ प्रार्थना”