अपघात कधीही आणि कोठेही होऊ शकतात. ज्या लोकांना असे वाटते ते सुरक्षितपणे गाडी चालवतात, ते देखील बऱ्याचदा अपघातांमध्ये बळी पडतात. रस्त्यावर मागे पुढे असलेल्या वाहनामुळे अपघात होऊ शकतो असे काही नाही कधी कधी आकाशातून अचानक विमान कोसळून अपघात होऊ शकतो. असाच काहीसा अपघात नायझेरियामध्ये घडला आहे. रस्त्यावर वाहनांची ये-जा सुरु असताना अचानक एक विमान रस्त्यावर कोसळते आणि पेट घेते. काही कळण्याआधीच मोठा अपघात घडतो आणि लोकांमध्ये एकच खळबळ उडते. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागतात. हा सर्व प्रकार एका व्हिडीओमध्ये कैद झाला असून तो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. सभी भागने लगे. ऐसा नजारा आपने शायद ही कभी देखा होगा.
ट्विटर अकाउंट @donadex02 वर पोस्ट केलेला व्हिडीओ एक विमाना गर्दीच्या ठिकाणी कोसळताना दिसत आहे. फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार हे हा व्हिडीओ नायझेरियातील लागोस जवळील आहे. ही दुर्घटना मगंळवारी घडली. नायझेरियन इमर्जन्सी मॅनेजमॅंट एजन्सीने सांगितले की, विमान जेव्हा कोसळले झाले तेव्हा त्यापैकी २ लोक बसलेले होते. कंट्रोल टॉवरने हे स्पष्ट केले की विमान कोसळले तेव्हा चार नव्हे दोन लोक बसलेले होते. दोन्ही लोक अपघातामधून थोडक्यात बचावले आहेत.
हेही वाचा – UNO खेळणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! चीफ UNO प्लेअर’च्या शोधात आहे ही कंपनी, फक्त काम करा अन् कमवा…
रस्त्यावरच कोसळलं विमान
एका सीसीटिव्ही कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला आहे ज्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की रस्त्यावर वाहनांची, माणसांची ये-जा सुरु आहे आणि अचानक आकाशातून एक विमान उडतं येते आणि जोराद जमिनीवर आदळते. जमिनीवर आदळताच विमानला आग लागते. सुदैवाने विमान कोणत्याही कार किंवा टँकरला धडकले नाही अन्यथा आणखी मोठा विस्फोट झाला असता.
हेही वाचा – तब्बल ३ दिवस लिफ्टमध्ये अडकली होती महिला, मदतीसाठी ओरडत राहिली अखेर….
व्हिडीओवर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत
या व्हिडीओमध्ये ८ हजारपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेच आणि काही लोकांनी कमेंट करून प्रतिक्रिया देखील दिली आहे. एकाने सांगितली की, ”अखेर लोक विमानाच्या अपघातामधून कसे वाचले. ही एक जादू आहे.” दुसऱ्याने सांगितले की, ”देवाचे आभार मानले पाहिजे त्यांने लोकांचा जीव वाचवला.” ”व्हिडीओ शेअर करताना एकाने लिहिले की, विमान जिथे कोसळले त्याच्या बाजूलाच एक गॅस स्टेशन आहे. जर त्यावर कोसळले असते तर खूप मोठी दुर्घटना झाली असती. ”