काही दिवसांपूर्वी टालेस सन्सची उपकंपनी असलेल्या टालेस प्रायव्हेट लिमिटेडने एअर इंडियाचे अधिग्रहण करण्यासाठी बोली जिंकली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यापासून, सोशल मीडियावर विविध प्रकारच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. ज्यात टाटा समूहाचे अध्यक्ष इमेरिटस रतन टाटा आहेत. त्यांनी या घटनेशी संबंधित एक फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीजच्या स्वरूपात शेअर केला आहे.
काय आहे फोटो?
त्यांनी शेअर केलेल्या फोटोत विमानाच्या आकाराची कुकी दिसते.ही कुकी एअर इंडियाच्या पारंपारिक लाल आणि पांढऱ्या रंगात सजवलेली आहे. त्यांनी सर रतन टाटा इन्स्टिट्यूट (आरटीआय) ला टॅग केले आणि “अडोरेबल कुकीज” साठी त्यांचे आभार मानले. ही कुकीज ज्यांनी पाठवली आहे ते मुंबई येथे स्थित एक स्वयंसेवी संस्था बेकरी जी लेडी नवजबाई टाटा यांनी १९२८ मध्ये टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे दुसरे पुत्र सर रतन टाटा यांना ट्रिब्यूट म्हणून स्थापन केली.
(हे ही वाचा: अवघ्या काही सेकंदात एकाच वेळी चीनमधल्या १५ इमारती झाल्या जमीनदोस्त; पाहा व्हायरल व्हिडीओ)
ताब्यात घेतल्यानंतर, सुमारे सात दशकांपूर्वी राष्ट्रीयीकरण (nationalized) झाल्यानंतर एअरलाईन त्याच्या संस्थापक टाटा समूहाकडे परत आली. त्याची स्थापना १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्स म्हणून झाली. नंतर, १९ ५३ मध्ये, भारताची पहिली विमान कंपनी राष्ट्रीयकृत झाली.
रतन टाटाच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तुमचे काय मत आहे?