सोशल मीडियाच्या जगात प्रसिद्धी लोक काय करतील याचा खरंच अंदाज लावता येत नाही. मेट्रो किंवा ट्रेनमध्ये डान्स करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. वारंवार मनाई करूनही लोक पुन्हा पुन्हा त्याच चुका करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर सध्या अशाच एका व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे. स्त्री २ चित्रपटातील तमन्ना भाटियाच्या ‘आज की रात’ सध्या तुफान लोकप्रिय झाले आहे. या गाण्यावर अनेक लोक डान्स करत व्हिडिओ पोस्ट करत आहे. डान्स करणे चुकीचे नाही पण कुठे डान्स करत आहोत याचे भान असणे गरजेचे आहे. सध्या एका तरुणीने तमन्ना भाटियाच्या ‘आज की रात’ गाण्यावर थेट मेट्रोमध्ये डान्स केला आहे. या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून काहींनी तरुणीच्या डान्सचे कौतुक केले तर काहींनी सार्वजनिक ठिकाणी डान्स केल्याबद्दल रोष व्यक्त केला.

सहेली रुद्र या वापरकर्त्याने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तरुणी मेट्रो कोचच्या मध्यभागी ‘आज की रात’च्या दमदार बीट्सवर डान्स करताना दिसत आहे. तिच्या कॅप्शनमध्ये, तरुणीने कॅप्शनमध्ये असे सांगितले की, लोकांच्या मागणीनुसार हा डान्स केला आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, प्रवासी या तरुणीचा डान्स पाहून थक्क झाले आहेत. काही जण आनंदित झालेले दिसतात, तर काही सार्वजनिक जागेवर डान्स केल्यामुळे चिडलेले दिसतात.

ही तरुणी डानस करताना काही सह-प्रवासी थेट कॅमेऱ्याकडे पाहताना दिसतात, तर काहीजण कॅमेऱ्याकडे आणि तरुणीकडे पाहणे टाळतात कारण त्यांना ते वर्तन अयोग्य वाटत आहे. या क्षणाने सर्जनशील अभिव्यक्ती आणि सार्वजनिक अस्वस्थता यांच्यातील रेषा कोठे काढायची याबद्दल ऑनलाइन वादविवादाला सुरुवात झाली आहे.

हा व्हिडीओ तीन दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता आणि इंस्टाग्रामवर आधीच आठ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. काही वापरकर्त्यांना व्हिडिओ मनोरंजक वाटला, तर काहींनी सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग मानून या कृतीवर नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा – “पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं ते उगाच नाही!” जगात नाही अशी रिक्षा आपल्या पुण्यात; Video होतोय Viral

नेटकऱ्यांनी व्यक्त केला रोष

ऑनलाइन समुदायाने नृत्य प्रदर्शनावर आपले मत व्यक्त केले. एका वापरकर्त्याने कमेंट केली, “लोक त्यांचे स्थान गमावत आहेत; डान्स परफॉर्मन्ससाठी हे योग्य ठिकाण नाही.” आणखी एकजण म्हणाला, “प्रत्येकजण तुमच्या मनोरंजनासाठी येथे नाही, कृपया लक्षात ठेवा.”

तरुणीच्या फॉलअरने तिचे कौतूक करत म्हटले की, “ती तिचे सर्वोत्तम जीवन जगत आहे! आनंद मिळत असेल तर नृत्य का करू नये?” पण नक्कीच हे सार्वजनिक ठिकाणी डान्स करू नये.

हेही वाचा –नव्या सिंग ठरली मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धेत सहभागी होणारी पहिली ट्रान्स वुमन!

“मी त्या कोचवर असतो तर मला खूप लाज वाटली असते,” एका नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.तर दुसऱ्याने म्हटले, “हा काही मंच नाही, सार्वजनिक वाहतूक आहे , काही लोक फक्त कामावर जाण्याचा प्रयत्न करत आहेत.”