अभ्यास करताना, काही लोक असतात ज्यांना सर्वात फास्ट प्रश्नांची उत्तर द्यायला आवडतात. शिक्षकही त्या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करतात, परंतु प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर तेच देऊ शकतील असे नाही. प्रत्येक मुलामध्ये एक वेगळी प्रतिभा असते, ज्यामध्ये त्यांना कोणीही मागे सोडू शकत नाही. जेव्हा आपण गणिताचा अभ्यास करतो तेव्हा काही प्रश्न सहजपणे सोडवणे कठीण आहे. आजकाल सोशल मीडियावर असे काही अवघड प्रश्न अचानक समोर येतात, जे समजायला लोकांना खूप वेळ लागतो. होय, असेच एक उदाहरण या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निव्वळ काही सेकंदांचे व्हिडीओही आपल्याला तासनतास मोबाईलमध्ये गुंतवून ठेवतात. असाच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे कसे घडले? असा प्रश्न पडेल. शीतपेयांच्या बॉटलची लोखंडी झाकण या व्हिडीओमध्ये बघायला मिळत आहेत.

(हे ही वाचा: ‘या’ व्हायरल फोटोत दडलेला आकडा तुम्ही सांगू शकता का? ९९ टक्के लोक ठरले अपयशी)

क्षणार्धात झाकण झाले गायब

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कॅमेऱ्यासमोर टेबलावर एकूण नऊ बॉटलची लोखंडी झाकण ठेवण्यात आल्या आहेत. यानंतर एक व्यक्ती लांब काठीने ते फिरवते आणि झाकण दोन भागांमध्ये विभाजित करते. नऊ झाकणांच्या ऐवजी आठचं दिसतात. नऊ झाकणांची आठ झाकण कशी झाली हे कोणालाच समजत नाही. काही लोकांनी हा व्हिडीओ अनेकदा पाहिला, पण उत्तर मिळाले नाही.

(हे ही वाचा: ऑनलाइन क्लासचा प्रभाव! मुलाने ‘या’ इंग्रजी शब्दाला दिले नवीन नाव, हा Viral Video एकदा बघाचं)

(हे ही वाचा: SBI Recruitment 2022: विविध पदांसाठी भरती, ६३ हजारांहून अधिक पगार, जाणून घ्या तपशील)

‘हे’ आहे उत्तर

व्हिडीओमध्ये, तुम्ही सुरुवातीला एकूण नऊ झाकण मोजली असतील, परंतु ती व्यक्ती काठी घेऊन त्या झाकणाना फिरवते तेव्हा फक्त आठ उरतात. हे घडले कारण मध्यभागी असलेल्या झाकणावर दुसरे झाकण झाकले जाते आणि नंतर त्यापैकी एक अदृश्य होते. तथापि, ते इतके सुबकपणे केले गेले आहे की प्रत्येकजण ते शोधू शकत नाही. सुमारे ९९ टक्के लोक या प्रश्नाचे उत्तर देण्यात अपयशी ठरले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Please tell how a lid disappeared from this video 99 percent of the people failed ttg