PM Narendra Modi in Europe: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोमवारी जर्मनीच्या (Germany) राजधानीत आगमन झाल्यावर भारतीय समुदायाच्या सदस्यांनी बर्लिनच्या (Berlin) प्रतिष्ठित ब्रँडनबर्ग गेटवर भारतील पद्धतीने जोशात स्वागत केलं. मोदी त्यांच्या तीन देशांच्या युरोप दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यावर आले असून ते पुढे डेन्मार्क (Denmark) आणि फ्रान्सलाही (France) जाणार आहेत.
पारंपारिक नऊ यार्ड पैठणी साड्या परिधान करून, महाराष्ट्रातील महिलांनी मोदींचे स्वागत करण्यासाठी प्रतिष्ठित ब्रॅन्डनबर्ग गेट येथे पारंपारिक लेझीम नृत्य सादर केले. पुण्यातील रमणबाग येथील ढोल-ताशा पथकाने पारंपारिक ढोल वाजवले आणि छत्रपती शिवाजीची वेशभूषा केलेली व्यक्तीही या उत्सवात सामील झाली.
“बर्लिनमध्ये पहाटेची वेळ होती तरीही भारतीय समुदायातील अनेक लोक आले. मोदींनीही त्यांच्याशी आवर्जून बातचीत केली. आमच्या डायस्पोराच्या कर्तृत्वाचा भारताला अभिमान आहे,” असे मोदींनी येथे आल्यानंतर ट्विट केले. ब्रॅंडनबर्ग गेटवर पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी डायस्पोरा नृत्य आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले गेले होते. “भारताचे रंग आणि विविधता बर्लिनच्या प्रतिष्ठित ब्रॅंडेनबर्ग गेटवर प्रदर्शित करण्यात आली आहे,” पंतप्रधान कार्यालयाने रंगीत सांस्कृतिक कार्यक्रमाच्या काही फोटोंसह ट्विट केले. “ब्रॅंडनबर्ग गेटवर भारताची फ्लेव्हर! एकदा पहा…,” असे दुसर्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
“पारंपारिक ढोल-ताशा, रमणबागचा ढोल-ताशा आणि लेझीमचा दणदणाट आणि उंच उडणारा भगवा,” असे भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
हॉटेल एडलॉन केम्पिंस्की येथे पहाटे चार वाजल्यापासून पंतप्रधानांची वाट पाहणाऱ्या लहान मुलांसह भारतीय डायस्पोरातील सदस्यांनी त्यांना पाहून “वंदे मातरम” आणि “भारत माता की जय” चा नारा दिला.