PM Narendra Modi’s Birthday: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. यंदाचा पंतप्रधानांचा वाढदिवस खास असणार आहे. याचे कारण म्हणजे या दिवशी सुमारे सात दशकांनंतर चित्त्यांची एक टीम भारतीय भूमीवर उतरणार आहे. ७० वर्षांनंतर नामिबियातून आठ चित्ते भारतात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चित्त्यांना प्रथम कार्गो विमानातून नामिबियाहून जयपूरला आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी हेलिकॉप्टर मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात आणले जाईल. जे पीएम मोदी त्यांच्या वाढदिवशी देशाला सुपूर्द करतील.
मध्य प्रदेशात होणार कार्यक्रम
मध्य प्रदेशात १७ तारखेला आफ्रिकन चित्त्यांच्या स्थलांतराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्यामध्ये पीएम मोदी सहभागी होणार असून देशाला चित्ता प्रकल्पाची भेट देणार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाची श्योपूरमध्ये तयारी जोरात सुरू झाली आहे. श्योपूरमध्ये 7 हेलिपॅड बांधले जात आहेत, त्यापैकी ३ राष्ट्रीय उद्यानाच्या आत बांधले जात आहेत.
( हे ही वाचा: विमानतळावर लग्नपत्रिका घेऊन जात होती तरुणी; तपासणी करताना जे सापडले ते पाहून पोलिसांना बसला जबरदस्त धक्का)
आठ चित्त्यांमध्ये पाच माद्या आणि तीन नर आहेत
नामिबियातून आलेल्या आठ चित्त्यांमध्ये पाच माद्या आणि तीन नर आहेत. त्यांना आणण्यासाठी भारताचा एक संघ रविवारी नामिबियाला रवाना झाला आहे. या विशेष पाहुण्यांना भारतात आणताना कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून त्यांना विशेष विमानाने आणले जात आहे. सर्व चित्त्यांना तीस दिवस क्वारंटाईन केले जाईल. नर आणि मादी चित्ता स्वतंत्र क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. यादरम्यान त्यांचे वर्तन, आरोग्य आणि इतर गोष्टींवर लक्ष ठेवले जाईल. महिनाभरानंतर या चित्त्यांना एक चौरस किलोमीटरच्या परिसरात सोडण्यात येणार आहे. त्यांच्या देखभालीसाठी पाच वर्षांसाठी ७५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना नामिबियातील चित्ता व्यवस्थापन तंत्राचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्तेही भारतात येणार आहेत.
जगात फक्त सात देशांमध्ये आढळून येतात चित्ता
जगातील फक्त ७ देशांमध्ये चित्ता आढळतो. सुमारे ५० चित्ते मध्य इराणमध्ये राहतात, तर आफ्रिकेतील ६ देशांमध्ये सुमारे ७ हजार चित्ते आढळतात. दक्षिण आफ्रिकेशिवाय मोझांबिक, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्येही चित्ता आढळतो. बोत्सवाना आणि अंगोलामध्ये चित्ता शिकार करतात आणि आनंदाने राहतात. १९५२ मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाला होता.
( हे ही वाचा: बैलाने सीटबेल्ट बांधून केली चक्क बाईकची सफर; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण)
अनेक देशांमध्ये चित्ताला लोक पाळतात
एका चित्ताची लांबी १.१ ते १.४ मीटर पर्यंत असते. तर चित्ताची सरासरी उंची ९४ सेमी पर्यंत असते. चित्त्याचे वजन २० ते २७ किलो असते. शेपटीची लांबी ६५ ते ८० सें.मी. असते. आम्ही तुम्हाला सांगतो की जगातील अनेक देशांमध्ये चित्ता देखील पाळला जातो. जगभरातील शास्त्रज्ञ अजूनही चित्त्याच्या आश्चर्यकारक गतीवर संशोधन करत आहेत. म्हणजेच एवढ्या वेगाने चित्ता कसा धावतो हे अजूनही गुपित आहे.