PM Modi Calls Draupadi Murmu African: निवडणुकीच्या काळात नेत्यांच्या वक्तव्याचे एडिटेड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर वर्णभेदी कमेंट केल्याचे सांगणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मोदी म्हणतात, “ज्यांच्या त्वचेचा रंग काळा आहे ते सर्व आफ्रिकेतील असतात. द्रौपदी मुर्मू सुद्धा आफ्रिकन आहे आणि त्यामुळे त्यांच्या त्वचेचा रंग काळा आहे त्यामुळे त्यांचा पराभव झाला पाहिजे.”असं या व्हिडीओमध्ये ऐकायला येत आहे. यासंदर्भात फॅक्ट क्रेसंडोने केलेल्या तपासात वेगळेच सत्य समोर आले आहे. मोदी खरोखरच असं म्हणाले का आणि असेल तरी ते कुणाला म्हणाले याबाबतचा सविस्तर आढावा नक्की वाचा..

काय होत आहे व्हायरल?

व्हायरल व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी म्हणतात की, राष्ट्रपतींच्या त्वचेचा रंग काळा असल्याने त्या आफ्रिकेतील वाटतात आणि त्यामुळेच त्यांचा पराभव झाला पाहिजे. युजर्स हा व्हिडीओम शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “भारतात ज्यांचा रंग काळा आहे, त्यांनी ४ जूनच्या आधी त्यांचा रंग गोरा करावा. कारण नरेंद्र मोदींनी भारतात जे काळे आहेत त्यांना आफ्रिकन म्हटले आहे. नरेंद्र मोदींनी तर आपल्या देशाच्या राष्ट्रपतींसाठी असे म्हटले आहे.”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?
https://x.com/ns0410088/status/1791899804131287117

तपास:

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, नरेंद्र मोदी ८ मे रोजी तेलंगणातील वारंगलमधील सभेत केलेल्या भाषणाचा हा व्हिडिओ आहे. भाजपने आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवरून या भाषणाचा व्हिडिओ थेट प्रक्षेपित केला होता.

संपूर्ण भाषण पाहिल्यावर आपल्यावर लक्षात येईल की, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींवर टिप्पणी करत नव्हते. ते राहुल गांधी आणि सॅम पित्रोदा यांच्यावर टीका करत होते.

नरेंद्र मोदी ४३:५० मिनिटांपासून म्हणतात की, “आज मला कळले की, राजकुमार (राहुल गांधींचे) काका (सॅम पित्रोदा) अमेरिकेत राहतात. राजकुमार काका त्यांचे तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक आहेत आणि आजकाल क्रिकेटमधील तिसरे पंच आहेत. जर काही गोंधळ असेल तर ते थर्ड अंपायरला विचारतात, त्याचप्रमाणे जर राजकुमार गोंधळला असेल तर ते सल्ला घेतात.”

पुढे ते सांगतात की, “या राजपुत्राच्या तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक काकांनी एक मोठं रहस्य उघड केल आहे. ते म्हणतात की, ज्यांच्या त्वचेचा रंग काळा आहे ते सर्व आफ्रिकेतील आहेत. याचा अर्थ त्यांनी त्वचेच्या रंगाच्या आधारे तुम्हा सर्वांना आणि माझ्या देशातील अनेक लोकांना अपमानीत केले. तेव्हाच मला समजले की त्वचेचा रंग पाहून त्यांनी असे गृहीत धरले की द्रौपदी मुर्मू देखील आफ्रिकन आहे आणि म्हणून जर तिच्या त्वचेचा रंग काळा असेल तर त्यांचा पराभव केला पाहिजे.”

एनडीटीव्हीने व्हायरल झालेल्या व्हिडीओशी संबंधित विधान अहवालात नमूद केले आहे. बातमीच्या हेडिंगमध्ये लिहिले होते की, “राजकुमाराचे काका अमेरिकेत… पंतप्रधान मोदींनी सॅम पित्रोदा यांच्या ‘काळ्या त्वचे’च्या विधानाने राहुल गांधींची कोंडी केली.”

खालील तुलनात्मक व्हिडीओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडीओला एडिट करून अर्धवट वक्तव्य व्हायरल होत आहे.

सॅम पित्रोदा

सॅम पित्रोदा एका मुलाखतीत म्हणाले की, “भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला आपण एकत्र ठेवू शकतो. पूर्वेकडील लोक चिनी लोकांसारखे दिसतात, पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात, उत्तरेकडील लोक बहुधा गोरे दिसतात आणि दक्षिण भारतातील लोक आफ्रिकनसारखे दिसतात. असे असूनही काही फरक पडत नाही. आपण सर्व भाऊ-बहिणी आहोत.”

या वक्तव्यनंतर बराच वाद झाला होता, तसेच अनेक भाजप नेत्यांनी या वक्तव्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.

निष्कर्ष: यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडीओ एडिटेड आहे. मुळात सॅम पित्रोदा यांनी “दक्षिण भारतातील लोक आफ्रिकनसारखे दिसतात.” असं म्हणण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी टीका करत होते.

हे ही वाचा<< विदेशात भारतीय भाज्यांवर बंदी, मसाल्यांच्या पाठोपाठ नवी कारवाई? उच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या चिंतेचं मूळ काय?

अनुवाद- अंकिता देशकर

(ही कथा मूळतः फॅक्टक्रेसेंडॉने प्रकाशित केली होती आणि शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून लोकसत्ताने पुनर्प्रकाशित केली आहे.)

Story img Loader