भारतामध्ये सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. मागील काही दिवसांपासून देशामध्ये रोज साडेतीन लाखांपेक्षा अधिक नवे करोना रुग्ण आढळून येत आहेत. तसेच रोज तीन हजारहून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू होत आहे. त्याचप्रमाणे देशामध्ये ऑक्सिजन बेड्स, औषधे यासारख्या गोष्टींचा तुटवडा जाणवू लागलाय. याच पार्श्वभूमीवर विरोधकांबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसारमाध्यमांकडूनही केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली जात आहे. केंद्राने करोना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वेळीच पावलं उचलली असती तर दुसऱ्या लाटेचा परिणाम कमी झाला असता असं विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही करोना परिस्थिती हाताळण्यात पंतप्रधानांना अपयश आल्याची टीका होताना दिसत आहे. अशाच मोदींचा एक जुना व्हिडीओही व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी केंद्र सरकारवर टीका करताना दिसत आहेत.
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच हा व्हिडीओ आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोदींनी त्यावेळी केंद्रात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसवर टीका केली होती. या व्हिडीओमध्ये मोदी केंद्र सरकारवर कठोर शब्दात टीका करताना दिसत आहे. “संकटं येत राहतात. मात्र एखाद्या संकटाच्या वेळी नेतृत्व दिशाहीन, असहाय्य आणि निराश असेल तर ते संकट अधिक गडद होतं. सव्वाशे कोटी लोकांचा देश आज निराशेच्या गर्तेत अडकला आहे. दिल्लीतून देशावर राज्य करणाऱ्यांबद्दल आशा निर्माण होईल, विश्वास निर्माण होईल, हरवलेला विश्वास पुन्हा ठेवता येईल असा कोणाताही विचार अथवा कृती दिल्लीतील राज्यकर्त्यांकडून केली जात नाहीय. पुढील वाटचालीसाठीच्या उपाययोजनाही दिल्लीने केल्या नसल्याचं दिसून येत आहे. देशाचे दुर्देव आहे की देश चालवणाऱ्यांना देशाच्या संरक्षणाची चिंता नाहीय आणि देशाच्या घसरणाऱ्या चलनाचीही चिंता नाहीय,” असं मोदी या व्हिडीओत बोलताना दिसत आहे.
उत्तर प्रदेशमधील माजी खासदार आणि सध्या प्रवक्ते असणाऱ्या अखिलेश सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच मोदींचा हा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर केला होता. “पाहा आताच्या करोना परिस्थितीसंदर्भात यापूर्वीच मोदीजींनी किती रोकठोकपणे खरं बोलले आहेत. नेतृत्व दिशाहीन, असहाय्य आणि निराश असेल तर संकट अधिक गडद होतं, असं ते म्हणाले होते,” असं सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
देखिये आज #कोविड19 के परिदृश्य में
बहुत पहले से ही
मोदी जी कितनी बेबाक़ी से सच्च बोल रहे है
नेतृत्व जब
दिशाहीन हो
असहाय हो
निराश हो
तब संकट गहरा हो जाता हैऔर दिल्ली के
शहंशाह की तरफ से कोई आशा जगे
ना यैसी सोच दिखाई देती है
ना यैसा कोई कदम दिखाई देता है pic.twitter.com/n6B6PtZDQv— Akhilesh P. Singh (@AkhileshPSingh) April 22, 2020
इतरांनीही हा व्हिडीओ मागील काही दिवसापासून शेअर करत मोदींवर निशाणा साधलाय.
१)
देखिये आज #कोविड19 के परिदृश्य में
बहुत पहले से ही
मोदी जी कितनी बेबाक़ी से सच्च बोल रहे है
नेतृत्व जब
दिशाहीन हो
असहाय हो
निराश हो
तब संकट गहरा हो जाता है
और दिल्ली के
शहंशाह की तरफ से कोई आशा जगे
ना एसी सोच दिखाई देती है
ना एसा कोई कदम दिखाई देता हैpic.twitter.com/ehqhizfqQQ— विरेन्द्र बिश्नोई (@VirendarBishno8) April 22, 2020
२)
संकट में नेतृत्व दिशाहीन, असहाय हो, तब संकट बहुत गहरा जाता है।#PMCaresFunds#ModiHaiTohMumkinHai #आज_आक्सीजन_कल_रोटी_जायेगी #COVID19India #CovidResources #CoronavirusIndia pic.twitter.com/kVIVxsLRBo
— Mahaveer Singh (@mvsgaharwar) April 27, 2021
३)
सध्या सोशल नेटवर्किंगवर या व्हिडीओची खूपच चर्चा असून सध्याच्या परिस्थितीला हा व्हिडीओ अगदी योग्य आहे असं अनेकांनी म्हटलं आहे.