पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ‘नरेंद्र मोदी अॅप’द्वारे भाजपाला एक हजार रुपयांची देणगी दिली असून जनतेनेही भाजपाला आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. ‘तुमच्या आर्थिक सहकार्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्याचा देशसेवेचा निश्चय दृढ होईल’, असे मोदींनी म्हटले आहे. मोदींनी यासंदर्भात एक ट्विट केले. मात्र या ट्विटवरील प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. अनेकांनी आमच्या खात्यात जे १५ लाख देणार होतात त्यामधून पैसे कापून घ्या आणि बाकीचे पैसे आमच्या खात्यावर टाका अशी उलट मागणी मोदींकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन जनतेला आवाहन केले आहे. ‘नरेंद्र मोदी अॅप’द्वारे जनतेला भाजपाला देणगी देता येईल. पाच रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंतची देणगी तुम्हाला या अॅपद्वारे देता येईल. जनतेने भाजपाला देणगी द्यावी आणि कारभारात पारदर्शकतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवावा. तुमचा पाठिंबा आणि योगदान आमच्या तळागाळातील कार्यकर्त्यांचा देशसेवेचा निश्चय दृढ करेल, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मात्र २०१६- १७ या आर्थिक वर्षात ५३२ कोटी रुपयांच्या देणग्या मिळालेल्या भाजपासाठीच मोदींनी देणगी मागितल्याने नेटकरी चांगलेच खवळेत. अनेकांनी मोदींनी २०१४ साली निवडणुकाच्या वेळी प्रचारादम्यान दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन दिली. परदेशातील काळा पैसा परत आणू, प्रत्येक नागरिकाच्या खात्यात किमान १५ लाख रुपये देऊ असे भाजपाने सांगितले होते. त्यामुळेच भाजपाला देणगी देण्याऐवजी भाजपानेच त्या १५ लाखांमधील पैसे देणगी म्हणून कापून घेत उरलेले पैसे त्वरीत आमच्या खात्यावर टाकावेत असे उत्तर मोदींच्या ट्विटला दिले आहे. पाहुयात मोदींच्या ट्विटवर आलेली अशीच काही मजेशीच उत्तरे

माझ्या १५ लाखांमधून १ हजार १०० कापून घ्या

माझ्या खात्यातून दोन लाख घ्या

पाच हजार एक रुपया कापून घ्या आणि बाकीचे खात्यावर टाका

१५ लाखाचं व्याज देणगी म्हणून घ्या ते १५ लाख द्या

एक लाख ठेवा उरलेले १४ तरी द्या

दहा रुपये कापून घ्या आणि १४ लाख ९९ हजार ९९० परत द्या

१५ लाख देणार म्हणाले आता देणगी मागताय

दरम्यान २०१६- १७ या आर्थिक वर्षात भाजपाला मिळालेल्या देणगीमध्ये २०१५-१६ च्या तुलनेत जवळपास ४५० कोटी रुपयांची भर पडली होती. २०१५ – १६ या आर्थिक वर्षात भाजपाला ७६. ८५ रुपये देणगीस्वरुपात मिळाले होते. सोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म (एडीआर) आणि नॅशनल इलेक्शन वॉच (एनईडब्ल्यू) यांनी संयुक्तरित्या तयार केलेल्या पाहणी अहवालात ही आकडेवारी समोर आली होती.